Friday, September 10, 2010

This Ganesh Utasv will relieve your Pressure

मनावरचाही ताण मिटवेल पर्यावरण पूरक गणपती उत्सव...



If you simply look at an Art your lips are spread and a line of smile
is drawn on your face - because it gives you a pleasure,

Imagine – if you yourself work with an Art, and create something – the joy in you shall be countless. May it be a painting, a decoration, a sketch or a poetry or any thing else...

The concentration, the energy you apply to create something, gives you back in form of Super relaxation. The pressure applied for the creation is relived, after your mind is delivered
through the art. The joy of creation immediately relieves the pressure (which is also positive) which is very good for your Heart and Health.

This Ganesh Utsav, make a vow to use only Eco friendly material for the decoration.
Don't use Thermacol, plastic and other Eco hazardous material, which is difficult to dispose.

Don't bring costly Idols. Try to avoid the Idols of Ganesh made from Plaster of paris.
Even the Shadu Soil is not recommended – though these Idols easily get soluble with water,
the colors used to paint are not necessarily Eco friendly.

ब्रम्हगिरी प्रदक्षिणाच्या मार्गावरील (मोठी - चाळीस मैलाची) हरीहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन कुशावर्त तलावाच्या किनाऱ्यावर दगडी पायऱ्यांमध्ये कोरून ठेवलेल्या गणपतीला वाहिलेली हळदीची फुले (की पाने)

 After all the Shadu soil which comes from Konkan has some limits. Since so many years the soil is used for making Idols, it is going to take heavy toll on its stocks in the Konkan Region.

If you yourself make a decoration from - craft paper, Cardboard, Card Sheet, Bamboo,
Saw Dust or any Eco friendly recycle material, it will give you great relaxation, the kids
in your home, the neighbors will take a good lesson from it and a very good message will be spread.

It will also save your cost...you can call your near and dear ones to your house and show them your creation...this way it will also bring the hearts closer...otherwise mutual visits and face to face talks have become very rare in this fast paced life style...

Photo Cap of the top picture : ब्रम्हगिरी प्रदक्षिणाच्या मार्गावरील (मोठी - चाळीस मैलाची) हरीहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन कुशावर्त तलावावरील उत्कृष्ट कोरीव काम केलेला गणपती शिलालेख

Tuesday, August 31, 2010

त्र्यंबकेश्‍वरचा गौतमी विळख्यात

आकाशी तवंग : पाणी हिरवे निळे, केरकचरा व बांधकाम साहित्य फेकण्याचा अड्डा!

नाशिक, ता. 17 :

वाचे म्हणता हर हर गंगा,

सकळ दोष जाती भंगा।।

दृष्टी पडता ब्रम्हगिरी,

त्यासी कैसी यमपूरी ।।

कुशावर्ती करिती स्नान,

त्याचे कैलासी राहणे...अशी महत्ती नाथांनी कथन केलेल्या मुळ गंगा...गौतमी...अर्थात गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा विषय काही नविन बाब नाही...परंतू आपल्या उगमस्थानी मलिन झालेल्या गोदे बरोबरच आता गावातल्या तलावांच्या प्रदुषणाचे प्रमाण सहजपणे दृष्टीस पडत आहे.

दक्षिण भारताची जिवनरेखा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी केवळ धार्मिक, आध्यात्मिक स्तरावरच नव्हे, तर आठशे मैलाचा विस्तीर्ण प्रदेश आपल्या पाण्याने सुपिक करून भोवताली असंख्य शहरे, गावे व खेड्या-पाड्यांचे पालन व पोषण करणाऱ्या गोदावरीला दक्षिण भारतात अनन्यसाधारण असे महत्व आहे.

नदी काठच्या गावांमुळे व कारखान्यांमुळे जगभर असंख्य नद्यांचे आरोग्य धोकादायक पातळीवर जाऊन पोहोचले आहे...परंतू हिंदू धर्मियांमध्ये सर्वोच्च आदर असणाऱ्या आणि जिच्या जळाची तुलना अमृताशी केली जाते त्या गोदावरीच्या वाटेला तिच्या जन्मस्थानी ही अवहेलना!



गौतमी तलावाला विळखा

त्र्यंबकेश्‍वर मंदीराच्या पाठीमागे व संगमाला खेटून असलेला पाच एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण गौतमी तलाव भरभरून वाहत असल्याचे चित्र प्रसन्न करणारे होते...कॅमेऱ्याची कॅप उतरवून तलावाची छबी चित्रबद्ध करत असताना पश्‍चिमेकडे ओव्हरफ्लोच्या ठिकाणी घाणीचा मोठा तवंग दिसून आला...हल्ली बऱ्याच नद्या, नाल्यात असे तवंग दिसतच असताता...परंतू या तवंगामध्ये आकाशी रंगाच्या घट्ट द्रवपदार्थाची मोठी मात्रा आढळली...जणू काही आकाशी रंगाचे ऑईलपेंटचे ड्रमच्या ड्रम कोणीतरी मोठ्या प्रमाणावर कोणी तरी पाण्यात मिसळले असावे. फक्त सांडपाण्यामुळे उठणाऱ्या तवंगापेक्षा हा प्रकार भिन्न व कमालीचा चिंतेचा वाटला.

असा दिवस जात नाही की त्र्यंबकेश्‍वरी भाविकांची गर्दी नाही...यात बहुतांशी भाविक त्रिपींडी, सपिंडी, नारायण नागबली-श्राद्धाती कार्यासाठी येतात...ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन घेतात...याशिवाय धार्मिक महत्व असलेली असंख्य ठिकाणे गावात चहुबाजूंना विखुरली आहेत...ज्यात निवृत्तीनाथ महाराजांची संजिवन समाधी सुद्धा आहे...इथल्या प्रत्येक पुजाविधीचा संबंध पाण्यात अंघोळ व तिर्थादीसाठी येतोच. या नगरातील एक मोठा तलाव इतका प्रदुषित असेल तर ती कमालीची क्‍लेषदायक बाब आहे. मंदिराचे माध्यान्ह पुजारी स्वर्गीय डॉक्‍टर नानासाहेब शुक्‍ल यांनी त्र्यंबकेश्‍वरच्या पर्यावरणासंबंधी विपुल प्रमाणावर चळवळ उभी करून सकस असे लिखाण केले आहे. दैनिक सकाळमध्ये त्यांचे या विषयावरील अनेक लेख यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत.


गौतमी तलावाचे पाणी हिरवे निळे झाले आहे. यातील निळा रंग हा ऑईल पेंटशी साधम्य साधणारा आहे. या शिवाय इतर प्रदुषणाकारी घटक सहज दृष्टीस पडतात. दृष्टीआडच्या प्रदुषणाचे काय?

नानासाहेबांच्या पश्‍चात या नगरीच्या प्रदुषणाचा व पर्यावरणाची ध्वजा कोणी तरी खांद्यावर पेलायला हवी. ही ताकद अर्थातच नव्या पिढीमध्ये आहे. इथल्या युवकांमध्ये जर नगराविषयी व इथल्या महान सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासीक वारशाविषयी ममत्व निर्माण करता आले तर या प्रश्‍नावर नक्कीस चळवळ उभारली जाऊ शकते. अर्थात या नगराच्या प्रदुषणाचा प्रश्‍न हा फक्त मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रस्तांशी जोडता येणार नाही. गावच्या मंडळींनी एकत्रितपणे केरकचरा, सांडपाणी व एकुणच स्वच्छतेच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेऊन जाणिवपूर्वक या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. एक वेळ पर्यटकांनी रस्त्यावर व शेताच्या कडेला फेकलेले कागद व बाटल्या उचलता येऊ शकतात, परंतू पाण्यात होणाऱ्या प्रदुषणाचे काय? त्यासाठीच नगरपालिकेने या विषयावर प्राधान्याने योजना तयार करायला हवी व त्यात गावच्या मंडळीचा सक्रीय सहभाग घ्यावा. काही तलावांवर संरक्षक जाळ्या बसविल्याने त्यात केरकचरा फेकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतू गौतमी सारख्या तलावांना अशी जाळी टाकणे दुरापास्त आहे. तलावात सर्रासपणे केरकचरा, बांधकाम केल्यावर निघणारा मलबा टाकले जातो. दगडी काठ असलेल्या तलावावर ठिकठीकाणी शिळ्या भाज्या फेकलेल्या दिसतात.

नित्य पुजाकर्म व आलप्या व्यवसायात मग्न असणाऱ्या मंडळींनी नुसते मनात आणुन प्रदुषणाचा वेगळा विचार सुरू केला तरी नदीच्या, तलावांच्या व पर्यायाने गावच्या स्वच्छतेचा सुंदर चित्र निर्माण होऊ शकेल.

---

Saturday, August 21, 2010

नाशिकमध्ये महाकाय फुलपाखरू

पाच इंच रुंदी : तलम रेशमी कांती, desigh like the tigers eye


नाशिक, ता. 20 ः पावसाळ्याच्या मध्यकाळात पाऊस थोडा उघडला, की नानाविध प्रकारच्या कीटकांची सृष्टी अवतीर्ण होते. यातील काही कीटकांचे रूप-रंग विस्मयचकित करणारे असते. आता हेच बघा ना, पंचवटीतल्या अन्नपूर्णा कॉम्प्लेक्‍समध्ये आज एक महाकाय आकाराचे फुलपाखरू उडून आले होते. एक लहान मुलगी ते कागदी असावे या हिशेबाने उचलायला गेली तेव्हा ते उडाले. घाबरून तिने घरात हा प्रकार कथन केला तेव्हा आपल्या दारापाशी कमालीचा देखणा जीव आल्याची प्रचीती आली.


काही वर्षांपूर्वी नाशिकमधील पपाया नर्सरीजवळ हाताच्या मुठीपेक्षाही मोठ्या आकाराच्या गोगलगायी कुतूहलाचा विषय ठरल्या होत्या. पुढे जाऊन या गोगलगायींची अशी काही पैदास वाढली, की जिल्ह्यातील बागायती शेतीसाठी ते एक मोठे संकट ठरले. तेव्हा हाच देखणा जीव नकोसा झाला होता. पंचवटीत अन्नपूर्णा कॉम्प्लेक्‍समध्ये दृष्टीस पडलेले फुलपाखरूही अभ्यासाचा विषय ठरू शकते. सर्वच फुलपाखरू हे निष्पाप नसतात. काही फुलपाखरू झाडांच्या पानांवर, खोडावर किंवा फांद्यावर अंडकोष तयार करतात. त्यातील अळी पक्व झाली, की ती झाडांची पाने खाऊन फुलपाखरात तिचे रूपांतर होते. हे फुलपाखरूही चांगले पाच इंच रुंदीचे होते. त्या अर्थी त्याचे अंडकोषसुद्धा मोठे असणार व त्याची अळीसुद्धा पानांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडत असणार. त्यांची उत्पत्ती जर शेकडोंच्या संख्येने होणार असेल, तर मात्र ती जिल्ह्यातील शेतीच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरू शकते.

नाशिकमध्ये सध्या भेडसावणाऱ्या गोगलगायी या भूमीतल्या नाहीत. त्या प्रजातीला "जायंट आफ्रिकन लॅन्ड स्नेल' असे म्हणतात. आपल्याकडे क्वारेन्टाइन नियमाबद्दल कमालीची ढिलाई बाळगली जाते. न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे बूट औषधी पाण्याने धुऊन देतात. आपत्ती किंवा साथ ठरतील अशा जिवांना पायबंद घालण्यासाठी त्यामुळे पर्यटकांनी त्यांच्या देशातील रोगजंतू आपल्या देशात सोबत आणू नयेत, ही त्यामागची भावना! लाकूड, रोपे, फळे व भाज्यांच्या आयातीचे नियमही कडक आहेत. आपल्याकडे एरवी गोगलगायी किंवा फुलपाखरे महाकाय आकारातील सहसा आढळत नाहीत. एखाददुसरे चुकून आले आणि त्याच्या फौजाच्या फौजा तयार झाल्या तर? त्यामुळेच प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या फळ, भाज्या, रोपे आदींची काटेकोर तपासणी करण्याचे धोरण अवलंबायला हवे. त्यामुळे रोगमुक्त व उत्तम प्रतीचा माल येण्याची शाश्‍वती राहील.

Wednesday, August 18, 2010

I just completed my first First Aid course :

On August 15, 2010 I completedmy First Aid course with the Indian Red Cross SSocieties Nashik Branch...actually 15 Aug. is my favorite outing date...Journalist get only four holidays in the whole year, viz. The Freedom day, Anant Chadurdishi, Diwali Padva and Rangpanchami. The other days there is a festive climate at home...but the freedom day is a great time to go out in the Sahyadris...at first it is rainy season...so the surrounding atmosphere is scenic with all the greenery...waterfalls go gushing here and there...

This time I choose to do a first aid course with the Red Cross society...once your education is decided after SSC or HSC there is little scope to enter medical field...not all can become a doctor...but to know basics in first aid is very important...it is not only useful at home...but u can also extend a support hand...whenever there is an accident or and emergency...

I think most of them who have a service kind of mindset should opt for this course. Of course there is a need to update oneself and be in touch...if one has to serve as a first aider...so practice regularly the bandages knots and the pressure points and message points to work effectively...

I accompanied with Samiran Kolhe, Pratik Ranalkar, two Pranav's Wamanacharya and Bhanose along with someparticipant.cipant...Mr. Dinesh Patil delivered excellently in the day long course...my 15 August this time was a real worth....

Wednesday, August 11, 2010

शोभा झाली ती पुरे...

देशाचा 64वा स्वातंत्र्यदिन चारच दिवसांवर येऊन ठेपले आहे...आणि आमच्यावर साहेबी छत्र असलेल्या राष्ट्रकुल नामक स्पर्धेच्या रूपाने एक नवे बालंट येऊ घातले आहे..."आम्ही खरोखरच इतके नालायक नाही', की राष्ट्रकुल सारखा इव्हेंट घेऊ शकत नाही...परंतू इंडियन ऑलिंम्पिकमधील काही मंडळींमुळे देशाची इभ्रत वेशीला टांगली गेली आहे...
ब्रिटिशांनी ज्या देशांवर अधिराज्य गाजविले त्या देशांचा समुह म्हणजेच राष्ट्रकुल. मुळात ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धांच्या जोडीला प्रत्येक खंडाच्या स्वतंत्र स्पर्धा (जसे एशियाड) होत असताना राष्ट्रकुल सारख्या मेगा इव्हेंटची आवश्‍यकता काय? असेही ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धांसाठी राष्ट्रकुलला नेहमीच बुट्टी मारणाऱ्या बड्या स्टार खेळाडूंची संख्या मोठी असते. आपल्या देशाला या स्पर्धेमुळे जर काही फायदा होणार होता, तर तो म्हणजे...

1. खेळांच्या पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या असत्या...
2. ज्या शहरात स्पर्धा त्याठिकाणी साधारणपणे वर्षभर उत्सवाचे वातावरण...
3. एशियाड सारख्या बड्या स्पर्धेच्या आयोजनाच्या दृष्टीने "आम्ही सक्षम आहोत' हे दाखविण्याची एक पायरी...

...पण ती पायरी सुद्धा आम्हाला आत्तापर्यंत नीटपणे पार करता आली नाही...प्रत्यक्षात स्पर्धा पार पडत असताना त्यात किती प्रमाणात सुधारणा होते...हे पाहण्या लायक ठरेल...चीनने बीजिंग ऑलिम्पिकचे ज्या पद्धतीने आयोजन करून संयोजनात एक नवा मापदंड घालून दिला...तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न युरोप व अमेरिका आदी राष्ट्र करत असताना भारताने आपल्या तांत्रिक सज्जतेची चुणूक दाखवून द्यायला हवी होती...चीनचे ऍक्रोबॅटिकल कौशल्या...स्वप्नवत वाटाव्या अशा कल्पना साकार करून सादर केलेला उद्‌घाटन समारंभ (जसे मैदानाच्या छताला उच्च क्षमतेचे दोर लाऊन त्यावरील कवायती...पृथ्वीच्या आकाराच्या महाकाय वर्तुळावरील कवायती...बॉक्‍स ग्रुप डिस्प्ले वगैरे...) आमच्या मंडळींनी मात्र राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील 30,000 कोटी रूपयांवर डल्ला मारण्यावर धन्यता मानली असे चित्र सद्या निर्माण झाले आहे...
...सद्या या भ्रष्टाचाराबद्दल कमालीचा धुराळा उडाला असताना कॉंग्रेसजन तर त्यास भ्रष्टाचार मानायला तयार नाही...ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर, दिग्विजय वगैरेचे या स्पर्धेवर टिका करणारे कटु बोल मला सुरूवातीला विस्मयकारक वाटत होते...परंतू त्यात आता सत्यता वाटू लागली आहे...माननीय सुरेश कलमाडी हात झटकून आपला कोणत्याही भ्रष्टाचारात सहभाग नाही...असे सांगत असले...आणि त्यावर एक वेळ विश्‍वास ठेवायचे म्हटले तरी...राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील सर्वोच्च व्यक्तिमत्व म्हणून भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घ्यायल नको होती का?
जर भ्रष्टाचारच झाला नसेल तर नुसत्या आरोपांनी ते किंवा त्यांची समिती व्यथित व्हायला काय अशिक्षित खेडूत वाटली का? मि. कलमाडी आणि श्रीयुत "आयओसी', देशाची शोभा झाली ती पुरे...आता तरी जागे व्हा...मैदाने एक वेळ वेळेवर पूर्ण झाली नाही तरी चालेल...परंतू स्पर्धेच्या वेळी कुणालाही बोलायला जागा ठेऊ नको...शेवटी आज तुमच्या समोर पैसा हा खरोखरच प्रश्‍न नाही...तो तर तुम्हाला मन मानेल तसे मिळाल आहे...आता तो इमानदारीने खर्च करा...आणि जबाबदार, तत्पर लोकांकडे कामांची वाटणी करा...काम न करणाऱ्यांना तात्काळ खड्यासारखे बाजुला करा...नाही तर भारताने एशियाड सारख्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन विसरून जावे...ऑलिम्पिक तर अजुन आपल्या पासून वीस एक वर्ष तरी लांब वाटत आहे...

जय हिंद!

Friday, August 6, 2010

अस्वस्थ ती!

अस्वस्थ करणारी अस्वस्थता
आज एक अतिशय सुंदर मुलगी आमच्या लहानग्या दुकानात आली होती. आमच्या छोट्याशा हस्तकला केंद्रावर काम करणाऱ्या दोघा मुलींशी तिची गेल्या वर्षभरापासून थोडी मैत्री जमली आहे. कालच सगळ्या जण विचारत होत्या की ती दिसत नाही हल्ली. नेमकी ती थोडं बोलायला आली आणि सगळ्यांनी तिला काल तिचीच आठवण काढल्याची कल्पना दिली. त्यावर तिचे उत्तर अस्वस्थ करणारे होते...
>
ती कोण आहे? तीचे नावा काय? कोणती जात, शिक्षण किती? असे प्रश्‍न त्या गोऱ्या पान तरूणीकडे बघितल्यावर सारखे मनात डोकवायचे...कारण ती आमच्या घरा समोरच्या कट पीसच्या दुकानात गेल्या दोन एक वर्षांपासून कामाला आहे. तिथे कपड्यांच्या घड्या घालणे...चहा-पाणी आणून देणे...झाडलोट करणे अशी कामे करताना ती दिसत असते...

मध्यमपेक्षा थोडी जास्त उंची...त्वचा उत्तम प्रकारे गोरी...ना हडकळी ना जाडी अशी मध्यम बांधणी...डोळे अतिशय बोलके...देवाने इतके सगळे देऊनही या मुलीचे नशिब तिला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे. हा प्रश्‍न शुक्रवारच्या दुपारी माझ्या डोक्‍यात पुन्हा डोकावला...आमची सौभाग्यवती तशी समजुतदार आहे...परंतू त्या तरूणी बद्दल चौकशी केलेली तिला आवडली असती की नाही...ठाऊक नाही...

माझ्या कडे हे नाही...माझ्या कडे ते नाही...चांगले घर असते तर...घरात गाडी असती तर...शिक्षणासाठी पैसा असता तर...घरच्यांनी एखाद्या चांगल्या कलेत पारंगत केले असते तर...चांगले सौदर्य मिळाले असते तर...चांगला आवाज...चांगली उंची...चांगले डोळे...चांगले केस...गोड गळा...भरदार आवाज...अशा एक ना अनेक गोष्टींची कामना करणारे लोक बरच भेटतात...या पैकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कामना या तरूणीच्या मनात सुद्धा नक्कीच असावी...कदाचीत गरिब कुटूंबातून आल्याने शिक्षण-संस्कार झाले नसतील...घरात पैशांची चणचण असेल...किंवा कमावणारे हात कमी व खाणारे तोंड अधिक असतील...काहीही असो...अशा मुलींचे नीट संगोपन झाले तर त्यांच्यातही एखादी "फुलराणी' तयार होऊ शकते...प्रश्‍न असा आहे...त्यांना कुठल्या शॉ'चा वरदहस्त लाभणार...आजकाल तर अशा तरूणींचे शोषण सहजगत्या होण्याचारखी स्थिती...त्यांच्यात उमेद जागवणे तर महत्वाचे...परंतू त्यांना सगळ्यात महत्वाचे म्हणजे जगायला शिकवायला हवे...सर्व काही असूनही जगता न येणाऱ्या गोष्टींची माहिती करून द्यायला हवी...माणसांची पारख करताना...चांगले व वाईट...दोघांना समान भावनेने बघता यायला हवे...शेवटी...येणाऱ्या काळात...चांगला किती चांगला...वाईट किती वाईट...हे स्पष्ट होईलच...परंतू...अशा तरूणींमध्ये नवी उमेद जागविताना त्यांना समोरच्या ओळखी...अनोळखी माणसांचा सामना कसा करावा...चांलताना...बोलताना सुरक्षित अंतर कसे ठेवावे...आपली कारकिर्द घडविताना- आपले लक्ष्य साध्य करण्याच्या वाटेत बाधा येऊ देऊ न देता आपल्या स्थितीत बदल कसा घडवावा...काय केले म्हणजे आपल्याला कमाईचे साधन मिळू शकेल...चांगली नोकरी...चांगल्या सेवा क्षेत्रात...उत्पादन...विपणन...अशा कुठल्याही क्षेत्रात ही तरूणी तयार होऊ शकते...यथावकाश तीला चांगला जोडीदार सुद्धा मिळू शकतो...कुटुंबाला देखिल ती सावरू शकते...मुळात तीने घाईगडबडीत चांगला जोड
ीदार शोधला आहे की वाईट हे कळायला मार्ग नाही...परंतू तिच्या बोलण्यातील दुख:च्या छटा या नक्कीच नाहीशा होऊ शकतात...प्रश्‍न आहे ती तीला फुलराणी बनविणारा शॉ सापडण्याचा...तिने सुद्धा नीट पारखून चांगला गुरू शोधावा...असा गुरू...जो तीला सातत्याने मार्गदर्शन करू शकेल...त्रयस्त भावनेतून तीच्या कारकिर्दीला आकार देऊ शकेल...
...बघु या काय देवाची मर्जी आहे ती...

Friday, July 16, 2010

बिगडे नवाब!

फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेचे सूप वाजले...तरी त्याचं कवित्व अजून सुरू आहे. महाराष्ट्रातील एका गर्भश्रीमंत व्यापारी व राजकीय पुढाऱ्याचा वर्तमानपत्राच्या संचालक मंडळावर असलेला मुलगा आपल्या लहानग्या मुलासह "जो-बर्गला अंतिम सामना बघण्यासाठी गेला होता...आपल्या मालकीच्या दैनिकात पहिल्या पानावर त्याने स्पर्धेबद्दल त्याचे अनुभव कथन केले आहेत...त्याच्या या बातमीतील वृत्तमूल्ये...तिची शैलीहा चर्चेचा विषय नाही...माझी चिंता वेगळीच आहे...

...पैसा...पैसा...पैसा
"खिशात आणि खात्यात' पैसा असला की माणसाचा आत्मविश्‍वास सातव्या आकाशावर चढल्याचे मी जवळून अनूभवले आहे...हाच आत्मविश्‍वास लक्ष्मीपूत्रांना सर्वसामान्यांपासून मात्र दूर नेत असतो...त्यामुळे आपले काय बिघडणार? ही मनोवृत्ती वाढीस लागल्याची उदाहरणे अनूभवण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही...एखादा बड्या कुटुंबातला मुलगा वाहतुक पोलिस, रखवालदार, लिफ्टमन, कारकुन या वर्गास धारेवर धरताना बऱ्याचदा दृष्टीस पडतात.

मुंबापूरीत 26 जुलै 2005ला झालेल्या अतिवृष्टीने पैशांचा कैफ किती अनाठायी ठरू शकतो हे जगाला दाखवून दिले आहे. असे अनेक व्यावसाय मुंबईत आहे जिथे दिवसाची कमाई वीस, पंचवीस लाखाच्या घरात जाईल. पण 26 जुलैच्या पावसाने साऱ्यांना समान पातळीवर आणले. वीज नाही, रस्ते कोंडवडलेले...रस्त्याच्या कडेला कारमध्ये अक्षरश: जखडून अनेकजण त्यावेळी मृत्यूमुखी पडले...तर काही जण इस्पितळात भरती झाले...अनेकांवर मानसिक परिणाम झाले...कमोड शिवाय बात नसणाऱ्यांना रस्त्याच्या किनाऱ्यावर "कार्यक्रम' उरकण्याची वेळ आली...अनेकांनी गरिब वस्तीतले पाणी पिले...पैशामुळे तुमचा आत्मविश्‍वास कितीही मोठा असला तरी जगात सर्वत्र सहजतेने वावरण्याचा तो (पैसा) परवाना नाही! हे तेव्हा स्पष्ट झाले होते...दक्षिण आफ्रिकेतल्या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यावर शिक्का मारला गेला...

Horrific experince of Jo'burg
"आमच्याकडे भरपूर पैसा आहे...कुणाच्या हात-पाया पडण्याची आवश्‍यकता नाही...अशी धारणा बनलेल्या श्रीमंतांच्या (कथित) पिढीसाठी या लक्ष्मीपुत्राचा अनुभव पुरेसा नेत्र उघडणारा आहे...म्हणजे त्याने लिहिलेल्या बातमीवरून नाही...तर त्याच्या अनुभवावरून...
महाशय म्हणतात, की दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेचे अभूतपूर्व आयोजन केले...समारोप सोहळ्याची रंगत डोळ्याचे पारणे फेडणारी होती...परंतु, मैदानात अनेक गोष्टींचा अभाव होता...अशा समारंभात कोणत्या गोष्टी असू नयेत याचा परिपाठ मिळाल्याचे ते म्हणतात...झाले असे की मैदानात समारोपाचा कार्यक्रम सुरू असताना थंडी वाढली...त्यांच्या लहानग्या मुलास ती असह्य झाल्याने त्यांनी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला...मैदानाबाहेर पडल्यानंतर त्यांची कार तीन किलोमीटरवर पार्क केली होती...सर्वच गाड्या लांबवर पार्क होत्या...कुणीही त्यांच्याकरिता गाडी आणेना...त्यांनी सोबत काही बॅंगा आणल्या होत्या...त्या घेऊन ते मुलाला उचलून तीन किलोमीटर चालू शकणार नव्हते...त्यांनी वाट्टेल तेवढा पैसा फेकण्याची तयारी दर्शविली...भेटेल त्याला आर्जव करीत होते...सुरक्षारक्षक...पोलिस...अटेन्डन्ट...पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष्य दिले नाही...सर्वांना अंतिम सामन्याकरिता सोपविलेली कामगिरी पार पाडायची होती...कोणीही आपली जागा सोडून जायाला तयार नव्हते...कमालीचे मेटाकुटीला आल्यानंतर मैदानात आलेली एक ऍम्ब्युलन्स त्यांना देण्यात आली व त्यांची नय्या पार झाली...म्हणजे त्यांना तीन किलोमीटरवरील त्यांच्या कारपर्यंत सोडण्यात आले...

तुमच्या पायांना काय झाले आहे...
श्रीमंत माणसाकडे पैसा जास्त असतो व वेळ कमी असतो. पैसा इतका की ते जग विकत घेऊ शकतात (असे त्यांना वाटते). वेळ इतका कमी असतो की ते भेटायला येणाऱ्यांशी मोजकेच बोलतात (म्हणजे फायदा असेल तरच), मित्र-परिवारातील कोणी आले तर एकतर कामाच्या तणावातून रिलीफ म्हणून किंवा थोडा ब्रेक म्हणूनही काही वेळा ही मंडळी प्रेमभावाने बोलण्याचा अविर्भाव आणतात...पण पैशाचा कैफ त्यांच्या बोलण्यातून नसला तरी कृतीतून सतत डोकावत असतो...या कथित संचालक पुत्राने पहिल्या पानावर व नंतर आतल्या पानात रकाने भरले तेव्हा त्याचे बुमरॅंग उलटू शकते याची कोणीत त्याला कल्पना दिली नाही...सुमार दर्जाची माणसे गोळा केल्यावर बातमीत काय आणि कसे सादर करायचे हे त्यांना फुकटचे कोण सांगणार...ही ठसठशीत बातमी शेवटी या तरूण संचालकावर उलटणार हे बुद्धिवादी वर्गाला समजण्याइतकी सरळसोट असती तरी एक वेळ चालले असते...परंतू त्यातली मेख ही तळागाळातल्या माणसालाही सहज समजेल याचा विचार सुद्धा केले गेला नाही...अहो हातातल्या बॅगा फेकुन का नाही दिल्या...जाताना तिथल्या हवामानाचा अंदाज का नाही घेतला...त्यानुसार गरम कपडे सोबत घ्यायला काय झाले होते...असे बेसिक प्रश्‍न सर्वसामान्य वाचकाच्याही सहज डोक्‍यात येतील...सल्लागारांच्या किंवा त्यांच्या हाताखालील संपादक वगैरेंच्या हे डोक्‍यात कसे आले नाही...या बातमीचा वार आपल्यावरच अधिक उलटू शकतो या बद्दल कोणी त्यांना अलर्ट कसे केले नाही...

Monday, June 14, 2010

मुंगळे : त्यांना झाले तरी काय?

नाशिकशहरात भरवस्तीत, केटीएचएम महाविद्यालयालगत हाताच्या पंजाच्या आकाराचे दोन टॅरेन्ट्यूला (भलेमोठे कोळी) आढळले...आमच्या घरातही या उन्हाळ्यात एक वेगळी घटना घडत होती...रोज त्याकडे लक्ष जायचे, पण त्यातला वेगळेपणा लक्षात येत नव्हता...पण आता त्यातले गांभीर्य लक्षात यायला लागले आहे...उन्हाळयाच्या तोंडावर मुंग्यां अन्नाचे कण साठवून ठेवतात हे सर्वांना ठाऊक आहे...त्यामुळे मुंग्यांच्या रांगा तोंडात पदार्थ नेताना दिसल्या की ती पावसाळ्याची चाहुल ओळखावी...ग्रामीण भागात उन्हाळ्यात लग्न असलेल्या घरात बुंदी किंवा साखरेवर मोठ मोठे मुंगळे आढळतात...आपल्याकडे काळ्या मुंग्यांना धार्मिक दृष्ट्या शुभ मानले आहे...आमच्या पेठरस्त्यावरील घरात उन्हाळ्यात यंदा गॅलरीतुन किचनच्या दिशेने कुच करणाऱ्या मोठ मोठ्या मुंगळ्यांच्या रांगा दिसु लागल्या...निसर्गाचे चक्र म्हणून गार्गी व मैत्रेयी यांना या रांगा मुद्दाम दाखविल्या. त्यांचा अर्थात त्याबाबत फारसा इंटरेस्ट जागा झाला नाही...काही दिवसांनी हे मोठमोठे मुंगळे घरात सर्वत्र पसरू लागले...

त्यांना दिसते की नाही?
टॉयलेटमध्ये गेल्यानंतर ते पायावर चढायचे...त्यांच्या समोर एखादी वस्तु वाजविली तरी ते फारसे डिस्टर्ब होत नसे...मला वाटले ही त्यांची धीटाई आहे...पण नंतर असे वाटू लागले की त्यांना डोळे आहे की नाही...त्यांचे डोळे दिसत नव्हते...त्यांच्या समोर काही आपटले तरी त्यांना ते कळत नव्हते...टिचकी मारली की ते सैरभैर व्हायचे...मे महिन्यात घरात काही जणांना या मुंगळ्यांनी चावा घेतला...सौभाग्यवती म्हाल्या त्यांचा डंख जोरदार असतो...परंतू ते अंगाला चिकटले तरी समजायचे नाही...फक्त रक्ताचा थेंब आपल्या अंगातून यायचा...आई सतत म्हणायची मेडिकलमधुन या मुंगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही तरी औषध घेऊन ये...निसर्गाच्या साखळीतले महत्वाचे किटक म्हणून मी आईला नुसते हो म्हणायचो...प्रत्यक्षात औषध आणले नाही...

आईन्स्टाईन "आई'
आईने किचनमध्ये मुंगळ्यांचे छिद्र चक्क बेलाडोनच्या पट्टीने झाकून टाकले तेव्हा आईची कृती मला अल्बर्ट आईन्स्टाईन सारखी भासली. या छिद्य्रातून मुंगळे ये जा करत...परंतू त्यांचा वेग बराच मंद झाला होता...जुनच्या पहिल्या सप्ताहातली गोष्ट...आईने उरलेले औषध कोठे ठेऊ म्हणून विचारले...आख्खी गॅलरी मुंगळ्यांच्या भरून गेली होती...पाऊडर टाकल्याने बरेच मुंगळे मरून पडले होते...मी मनातून थोडा हळहळो...दोन दिवसांनी पुन्हा बरोच मुंगळे पावडरच्या प्रभावामुळे मरून पडले होते...तरीही रात्रीच्या वेळी काही अंगावर चढून यायचे...एखादा दुसरा चावा सुद्धा घ्यायचा...

त्यांचे सेन्सेशन हरवले आहे का?
आमच्या घराच्या आसपास थोडी झाडी आहे व मोकळी जागा आहे...परंतू आजवरक कधीही इतक्‍या मोठ्या प्रमाणात मुंगळे आले नव्हते...अजुनी ते ये-जा करतात...सर्वात म्हत्वाचे म्हणजे त्यांना सेन्सेशन आहे की नाही...दृष्टी आहे की नाही...या शंका मनात घर करून आहेत...हल्ली निसर्गातले असे बदल जागतिक तापमानवाढीशी जोडले जातात...हा सुद्धा तसाच काहीसा प्रकार तर नाही?

Monday, April 12, 2010

हा रविवार चांगलाच लक्षात राहील...

गार्गी (दुसरी) मैत्रेयी (बालवाडी) यांच्या परिक्षा संपल्यानंतरचा पहिला रविवार बाहेर कुठेही फिरायला जाण्याचा प्लॅन नव्हता. म्हटलं घरातलीच राहिलेल्या कामांना माझी साप्ताहीक सुट्टी सत्कारणी लाऊ! पण कसले काय, मित्रवर्य कैलास(चंद्र) ठाकरेंचा फोन आला की देवळाली कॅम्पला थोडी खरेदी करूया आणि तिथल्या मंदिर परिसरात दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेऊया.
...हातातली कामे तशीच बाजुला ठेऊन आमच्या सौभाग्यवतिंनी छान पैकी इडली, डोसे बनवून घेतले. पंडित कॉलनीत श्री. ठाकरेंच्या घरी गेलो तर त्यांची कार सुरू होईना...दुपारचा बारा वाजलेले. मग त्यांनी सांगितले, देवळालीचं कॅन्सल करू, तुम्हीच जवळ पासचे ठिकाण सुचवा...माझ्या मनात पांडवलेण्यांच्या जवळीत नेहरू नक्षत्रवनाचा बेत होता, परंतू काही तरी वेगळा स्पॉट सुचवा अशी फर्माईश आली...मग मकालू हॉटेलच्या जवळ आमच्या दुचाक्‍यांमध्ये पेट्रोलची मात्रा घेतली आणि सोमेश्‍वरचा रस्ता धरला...वाटेत ठाकरे दांम्पत्याने ताजे पेरू घेतले...मग सामेश्‍वर सोडले आणि शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदिराचा रस्ता धरला, परंतू माझ्या डोक्‍यात ते ठिकाण नव्हतेच...मी वाय फोर्कवर गंगापूर गावात टर्न घेतला. जुन्या धाटणीचं ते लहानसं इतिहास प्रसिद्ध गाव...गावातील ऐतिहासिक सोनवणे वाड्या समोरून आम्ही गोदेच्या सांडव्यावर आलो...तेथे वाहणारे अथांग पाणी बघुन साऱ्यांची मने प्रसन्न झाली...कैलास, स्मिता व लहानगी यज्ञा या ठाकरे कुटुंबियांकरिता हा स्पॉट नवा होता...तिथून गाठले ते जलालपूर व गोदेच्या किनाऱ्यावर नितांत शांत व रमणीय ठिकाणी वसलेला गोविंद महाराजांचा आश्रम...आमच्या सौभाग्यवता नम्रताबाईंना हे ठिकाण ठाऊक असल्याने सर्वांना आडवाटेने पायी जायला सांगितले...वाटेत शेताच्या बांधाचे पाणी...अंब्याची झाडे बघुन मुली हरखुन गेल्या...आश्रमात पायावर पाणी घेतले आणि प्रथम गोविंद महाराजांचे दर्शन घेऊन थेट भोजनावर ताव मारला...गोदेच्या नितांत शांत, रमणीय प्रवाहाच्या साक्षीने तास दिडसात हा वजभोजाचा कार्यक्रम सुरू होता...उन्ह मी म्हणत असतानाही विविध पक्षांच्या खोड्या सूरू होत्या...भोजन आटोपल्यावर गार्गी, मैत्रेयी, यज्ञा यांना पाण्यात उतरवले...तीन वाजेच्या सुमारास परतीचा रस्ता धरला...म्हटलं संध्याकाळी काही तर व
ेगळा प्रोग्राम करू...उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता...तशाच अपूर्वाई हॉटेलच्या अलिकडे स्मिता ठाकरेंना अस्वस्थपणा जाणवू लागला...मी पुढे असल्याने कैलासने मला थांबण्याचा इशारा केला...माझ्या डोक्‍यात कल्पना होती ती आनंदवल्ली गावातल्या रस गुऱ्हाळात थांबून ताजा रस घेऊ म्हणजे थोडं बरं वाटेल...आम्ही गाड्यांना स्टार्ट दिला सुद्धा...पण स्मिता ठाकरेंना जास्तच त्रास जाणवत होता...पाहता पाहता त्यांनी डोळे पांढरे केले व त्यांची शुद्ध हरपली...सौभाग्यवती नम्रतांनी तातडीने त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला...लहानगी यज्ञा आईची अवस्था बघुन रडू लागली...तर माझ्या मुली विस्मयचकित होऊन सारे पहात होत्या...मी रस्त्यावर धावलो...पण एकही रिक्षा किंवा वाहन दिसत नव्हते...एक रिक्षा समोरून आली...पण त्यात एक महिला होती व त्यांनी रेल्वे पकडण्यासाठी स्पेशल रिक्षा केली होती...माझी आर्जव बघुन रिक्षा पूढे जाऊन थांबली...त्यांना झाला प्रकार कथन केला व त्यांनी तातडीने पेशंटला नेण्याची तयारी दर्शविली...आनंदवल्ली येथे डॉ. राहूल भोसले दवाखान्यात नव्हते...तेव्हा केटीएचएम महाविद्यालया समोर देवगारकर इस्पितळ गाठले...तो पर्यंत स्मिता ठाकरे पुन्हा शुद्धीवर आल्या होत्या...पण अंगात प्रचंड अशक्तपणा त्यांना जाणवत होता...डॉक्‍टरांनी उन लागल्याचे प्राथमिक निदान करून उपचार सुरू केले...मी कैलास ठाकरेंच्या घरात सगळ्या मुलींनी सांभाळत बसलो...तर नम्रताबाई दवाखान्यात स्मितांबाईंच्या जवळ थांबल्या...एक सलाईन संपल्यावर नम्रताबाईंना घेऊन कैलासराव त्यांच्या घरी आले...आमच्या सौभाग्यवतिंनी त्यांचे किचेन आवरून दिले व घर स्वच्छ केले...आता स्मिताबाई दोन तिन दिवस काम करू शकणार नाही हे स्पष्टच होते...रात्री ठाकरेंसाठी मग दाळ-वाटीचा मेन्यू तयार केला...रात्रीच स्मिताबाईंना डिस्चार्ज मिळाला...ऊन लागणे काय असते हे
नुसते ऐकुन होतो...प्रत्यक्ष त्याची अनूभूती आम्ही प्रथमच घेतली...तातडीने हालचाल केल्याने रूग्णाला फारसा त्रास झाला नाही...फक्त इतकेच समजले की त्यांना यापूर्वी सुद्धा असा त्रास झाला आहे...आहार व व्यायामाच्या बाबतीत निष्काळजीपणा...हल्लीच्या वर्कहोलिक कल्चरमधली ही आणखी एक वर्कहोलिक (शब्द अल्कोहोलिकवरून, म्हणजे आपल्या क्षेत्रात देहभान विसरून वेड्यागत काम करणारी मंडळी) केस असल्याचे समजले...आमच्या सौभाग्यवती सुद्धा एखाद्या कामाचा असाच जिवतोड पाठपूरावा करतात...परंतू आपले शरीर हे आरामासाठी किंवा बसल्या जागी काम करण्यासाठी बनलेले नाही...त्यांची सातत्याने हालचाल गरजेची आहे...चांगला आहार घ्यावा व कोणत्या गोष्टी परिक्षाम करतात व दुष्परिणाम करतात यांची गृहिणींनी माहिती घ्यावी....त्या दृष्टीने माझ्या सौ व मुलींकरिता सुद्धा आजचा रविवार ( 11 एप्रिल, 2010) लक्षात राहणारा ठरला...

Friday, February 19, 2010

Celebrate this Holi with Ayurvedic Colors ;


Lets mark the begining and turn to the eco friendly culture of INDIA


With the winter mists melting in the sunshine, Phalgun brings new life to every leaf and bud, announcing that Vasant Ritu or springtime has come with its great display of flowers and fruits. While nature wears verdant new robes, the vernal equinox brings hope to farmers. This joyful new beginning is celebrated on the full moon day of Phalgun at the most colourful festival of India – Holi.

Colour or gulal is invariably associated with holi. We don’t exactly know when this tradition of playing with colours on Holi started. Indians have played Holi for many centuries. Ancient scriptures like the Rig-Veda and the Gaduda Purana mention this ritual of people sprinkling colours on each other.
They played with gulal - powder made out of spring blossoms, leaf and fruit extracts. The red was Raktachandan (Pterocarpus santali-nus); the green was blended Mehendi and the yellow was dried Amaltas (Cassia fistula) and Marigold / Gainda (Tagetus erecta).

The Vedas suggested use of the colour of the palash (teshu or dhak) flower. This tree is also called 'the flame of the forest'. The flowers are bright red in colour and they used to be collected from the trees and spread out on mats, to dry in the sun. Once dried, they were then ground to a fine powder. This powder was then mixed with water to give a beautiful saffron-red colour. If clothes soaked in this colour are worn, the colour enters the pores of the skin providing protection from contagious diseases. It has miraculous medicinal effects. Earlier, young princes leaving for their Guru's Ashram used to carry a Palash Danad (stick). It is believed that the stick protected them from diseases and harmful viruses. Palash flowers and tree bark cure many skin diseases. If a pregnant woman consumes Palash flower juice, the child is bound to be immune to many skin and viral diseases.
It is said that Krishna made a concoction of these flowers and used it to shower the gopis with colour. This tradition continues even today. The gesture of throwing colours over each other (in many Krishna temples, even the idols are given a bath or sprinkling of colour) is a joyous celebration of the rejuvenation of nature and renewed hope of happiness and peaceful co-existence.
The playful throwing of colored powder has a medicinal significance too. The spring season, during which the weather changes, is believed to cause viral fever and cold. The colours are
traditionally made of Neem, Kumkum, Haldi, Bilva, and other medicinal herbs prescribed by Ayurvedic doctors.
We still play with gulal. But now the colours come from chemicals. The red is mercury sulphite; the green, copper sulphate; and the black paste has lead oxide. That is not all. Several dry colours use asbestos talc, chalk powder or silica as their base.
Unlike most Indian festivals, Holi has transcended the religious observances associated with it, and all of India cuts loose for a day of mirthful abandon. It is indeed a festival of joy and merriment, celebrated as both Man and Nature cast off their winter gloom. Holi heralds the arrival of spring - the season of hope and new beginnings and the rekindling of the spirit of life.

Wednesday, February 17, 2010

जिव्हाग्री टेकलें कवींठ


शिवरात्री : कवठाची गोडी अविट करणारा सण
----
नाशिक, ता. 11 : कवीठ किंवा कौठ या फळाचे आणि महाशिवरात्रीचे घनिष्ट नाते आहे. कवठाच्या प्रत्येक बीमधून शिवऽ शिवऽ ऐकु येते म्हणून कवठाचे सेवन केल्याने भाविक शिवमय होऊन जातात अशी मान्यता असल्याने हिंदूंमध्ये घराघरात कवठाचे पदार्थ खास शिवरात्रीला तयार केले जातात. कवठाची मिरची-कोथिंबीर कुटून केलेली चटणी तर अविट, पण चुरलेल्या गुळासोबत कवठाचा गर म्हणजे त्याचा स्वाद काय वर्णावा. गेल्या काही दिवसांपासून शेतांमधली कवठाची झाडे भरगच्च फळांनी लगडली आहेत. शिवरात्रीच्या बेताला ती पक्व होतील, अशा बेताने बळीराजाने ती गवतामध्ये पिकण्यासाठी दडपून ठेवली आहेत.

कैंसें एकचि केवढें पसरलें। त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकलें ।।
जैसें कां कवींठ घातलें। वडवानळीं।।
(एकच मुख-कसे व केवढे पसरले आहे? ज्या प्रमाणे वडवानळामध्ये कवठ घालावे त्याप्रमाणे हे तिन्हींही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात.) भारतीय संस्कृतीमध्ये वनमहात्मय धार्मिक आणि तात्त्विक विचारसरणीमध्ये जोपासले आहे. श्‍लोक 30मध्ये ज्ञानेश्‍वर माऊंलींनी सर्वव्यापी श्रीकृष्णाची तुलना करताना कवठाच्या अविट गोडीची महत्ती सांगितली आहे.
संस्कृतमध्ये कपित्थ, हिंदीत कैथा किंवा कैथ बेल, बंगालीत कोंथ बेल अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या कवठाला इंग्रजीत वुड ऍपल म्हणतात. तसे त्यांच्यात बऱ्याच फळांना आकार, रंगानुरूप बेरी किंवा ऍपल हे विशेषण चिकटवले तरी झाले. एलिफंड ऍपल हे नाव मात्र हत्तींना प्रिय फळ म्हणून किंवा मंकी फ्रुट - माकडांना प्रिय म्हणून पडले असावे.

बहुगीणी
हे फळ मुलत: भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व इतर दक्षिण आशियाई राष्ट्रात प्रामुख्याने आढळते. पाश्‍चात्य देशात नैसर्गिक पेयामध्ये स्वाद वाढविण्यासाठी याचा वापर केला जातो. कवठापासून जॅम, जेली सुद्धा बनवतात. काही जण निरेची साखर व कवठाच्या गरातील तंतुंचा वापर करून उत्तम प्रतचे शरबत बनवतात, परंतू कवठाचे अखंड झाड हे बुगुणी आहे. कवठाचे लाकूड हे मजबुत व टिकाऊ असल्याने त्यांचा बांधकामात वापर होतो, त्याच प्रमाणे लाकडी मॉडेल्स बनविण्याकरिता त्याचा उपयोग होतो. त्याच्यावर नक्षीकामसुद्धा चांगल्या पद्धतीने होते. शेतीची अवजारा, फुटपट्ट्या, व यंत्राती भाग त्यापासून बनविले जातात.
पावसाळ्यापश्‍चात या झाडातून पांढरा डिंक निघतो, त्यापासून जलरंग, शाई, कपड्यांचे रंग, वॉर्निश तयार केले जाताता.
जुन्या काळी कवठाचा डिंक व चुना एकत्र करून क्रुत्रीम जलस्त्रोतांचे वॉटरप्रुफिंग केले जायचे असा उल्लेख जुन्या ग्रंथात आढळतो. जुन्या काळी तैलचित्रांचे संवर्धन करण्यासाठी या झाडाचा डिंग वापरला जायचा. तर गृहीणी या झाडापासून फेसाळणारा द्रव बनवून त्याचा वस्त्र स्वच्छ करण्यासाठी वापर करायच्या.
आरोग्यवर्धक
यजुर्वेदात कवठाचा उल्लेक आढळतो. चरक संहितेत शरीराच्या विविध व्याधींवर कंवठाचे उपयोग सांगितले आहे. पित्ताशय, अपचन, वायुविकारात कवठाचा मोठा लाभ सांगितला आहे. त्यासाठी कोवळा पाला दुध-साखर एकत्रकरून दिला जातो. आयुर्वेदशास्त्रात काळीज व हृदयाच्या आजारात हे लाभकारी मानले जाते. अतिसार व पोटाच्या विकारात कच्चे कौठ दिले जाते. ग्रामीण भागात सर्प, विंचू किंवा किटक चावल्यास झाडाची साल, फळाचा गर चावून त्याचा चोथा लावण्याची प्रथा आहे.
---

Wednesday, January 27, 2010

इतिहासाची पुनरावृत्ती;

उत्साह वाढवताहेत बक्षिसे...अन्‌ शुभेच्छा!




ध्यानी मनी नसताना एखादी घटना घडते..."तुम्हाला राजीमाना द्यावा लागेल'...असे शब्द कानी पडतात...चुक नसताना आलेले हे बालंट नोकरी जाण्याच्या भावनेपेक्षाही जास्त बिकट...असा प्रसंग मी 2009 साली अनुभवला होता...आज त्यात घटनेचा पुढचा अंक...या वेळचा प्रसंगी मात्र सर्वस्वी निराळा...ज्या घटनेमुळे माझी नोकरी जाण्याची पाळी आली होती, त्याच प्रसंगात यंदा मी बक्षिसाचा मानकरी ठरलो.

बिग गन्स नेव्हिगेशन कार रॅलीत मला अनपेक्षीतपणे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले. त्याचे सविस्तर वृत्त रविवार दिनांक 10 जानेवारी, सकाळच्या नाशिक आवृत्तीमध्ये छापुन आले होते.
सोमवारी माझे जुने फोटोग्राफर मित्र सचिन निरंतर यांचा अभिनंदनाचा फोन - तुला तिसरा व पाचवा क्रमांक मिळाला आहे. मला वाटले कार रॅलीत तिसरे बक्षिस मिळाल्याच्या बातमीबद्दल तो अभिनंदन करतोय! मी म्हटले, मित्रा मला तिसरा क्रमांक मिळाला आहे. एका वेळेस एकच बक्षिस मिळते. तो म्हणाला नाही दोन बक्षिसे आहेत व मला (म्हणजे त्याला) द्वितीय, तर दैनिक सामनाचे भूषण पाटील यांना प्रथम बक्षिस मिळाले आहे. लगेच ट्युब पेटली - हा तर स्पोर्टस्‌क्राफ्टच्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल.
मागच्या वर्षी या इव्हेटच्या प्रॅक्‍टीसराऊन्डची बातमी आमच्या दैनिकात मिस झाली होती (त्यात माझा कोणताही रोल नाही). या घटनेवरून काही गैरसमज झाले आणि संपादकांनी व्यवस्थापकांना बोलावून मला काढून टाकण्याचे आदेश दिले. माझ्या चेहऱ्यावर कमालीचा निर्विकारपणा होता - हे काय चालले आहे? पश्‍चाताप नव्हताच. मी चुक केली नाही, तर पश्‍चाताप का करू, आणि तो माझ्या चेहऱ्यावरून प्रतिबिंबीत तरी कसा होणार? अशी ती अवस्था होती. संपादकांना वाटले मला झाल्या प्रसंगाबद्दल काहीही वाईट वाटले नाही, तर मला वाटत होते, की ज्या सहकाऱ्यावर बातमीची जबाबदारी दिली, त्याने अक्षम्य दुर्लक्ष केले.

सरतेशेवटी माझ्याबद्दलचा तो निर्णय मागे फिरला हा भाग अलाहीदा, परतू म्हणतात ना - हिस्ट्री रिपीट्‌स इटसेल्फ; आज त्याच स्पोर्टस्‌क्राफ्टच्या स्पर्धेने मला दोन बक्षिसे मिळवून दिली आहेत. माझी "एक पुरस्कार विजेता छायाचित्रकार' अशी नविन ओळख या घटनेने करून दिली आहे.

तसे बघितले तर जानेवारी 2010 या वर्षाची सुरूवातच धुमधडाक्‍यात झाली आहे - कोणताही संकल्प सोडलेला नसताना एकापाठोपाठ एक सुखद धक्कादेणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत. पहिला धक्का म्हणजे मी एक कॅमेरा विकत घेतला. अनेक छंद करून झालेत, परंतू स्टिल फोटोग्राफी ही केवळ दुसऱ्यांच्या कॅमेऱ्यातूनच करण्याचे योग येत होते. त्यातही प्रोफेशनल कॅमरा हाताळण्याची फारशी संधी मिळाली नाही. डिजीटल क्रांतीतील ऍमॅच्युअर कॅमेरे व ऑटोमोडच्या बळावर काही प्रेक्षणीय छायाचित्रे जरूर टिपलीत, पण त्याचे श्रेय हे सह्यगिरीतील भ्रमंतीलाच अधिक. कारण अशी अफलतून दृष्य एरवी बघायला मिळत नाहीत.

काही जुन्या फोटोग्राफर मित्रांसोबत परंतू वेस्टर्न इंडिया स्पोर्टस्‌ असोसिएशनच्या राष्ट्रीय कार रॅली अजिंक्‍यपदाचे वार्तांकन करताना सतत टाकतो, तसा खडा टाकुन दिला, "तुमच्या पैकी जर कोणाला तुमचा कॅमेरा विकायचा असेल तर मला कळवा, मी त्यावर विचार करीन'. या प्रश्‍नावर नेहमी प्रमाणे आम्ही आमचा कॅमेरा आत्ताच दिला, अगोदर सांगायला हवे होते' हे उत्तर मिळाले.
खरे तर अगोदर सांगणार कसे, जो भेटेल त्याला सांगत होतो. आता स्वत:चा कॅमेरा हवा असे मनोमन वाटत होते. मनातील घुसमट व्यक्त करण्याचे ते एक सुंदर व्यासपिठ असल्याचे मी नम्रताला सांगत होतो. माझे शुन्यात हरविणारे डोळे बघुन तिनेही होकार दिला होता. परंतू पाच ते दहा हजारापेक्षा जास्त बजेट अफोर्ड करू शकणार नाही, हे स्पष्ट होते. मित्रवर्य सचिन पाचोरकरांनी एक लेटेस्ट सेमी प्रो कॅमेरा बघिला, परतू त्याची किंमत 22000 होती, त्यामुळे ते सुद्धा एक दुरचेच स्वप्न वाटत होते. जी काही कमाई होते, ती सर्व दैनंदिन खर्च व त्यातून जे काही शिल्लक राहील, त्यातून हॅन्डीक्राफ्टचा उद्योग उभा करणे याकरिता खर्ची होत होती.
अखेर प्रविण पगारेंनी कॅननचा "मार्क 5 डी' घेतला व आपला कॅमेरा विकण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रोफेशनल "400 डी - डिजीटल रिबल एक्‍सटीआय' अशा पद्धतीने माझ्याकडे आला. हा एक मोठ्ठाच धक्का. मित्र अभिलाष बोटेकरने पाच हजाराची तातडीची मदत केली. पुस्तकाचे एक काम आल्याने वरचे साडे आठ हजार महिन्याभरात फेडणे शक्‍य होणार होते.
डिसेंबर महिन्यात स्पोर्टस्‌क्राफ्टची रॅली होती. कार्यालयात फोन करून इव्हेंट कव्हर करण्यास सांगितले. मागिल वर्षाचा अनूभव सर्वांना ठाऊक होताच, परंतू बातमी व छायाचित्रासाठी माणूस नसल्याने मला तातडीने पाचारण करण्यात आले. अशा पद्धतीने आदल्या वर्षी माझ्या मुळावर उठलेला इव्हेंट कव्हर करण्याची जबाबदारी माझ्या शिरावर येऊन पडली. कॅमेरा येऊन आठवडाही झाला नव्हता, तरी पण मला फोटोग्राफीचा गंध नसल्याने मी सचिन निरंतर यांना दरोज फोटो देत जा! अशी विंनंती केली.
मी 1996-97 पासून नाशिक परिसरात वेगवेगळे मोटर स्पोर्टस्‌ इव्हेंट पत्रकार म्हणून कव्हर केले आहेत, त्यातही काही राष्ट्रीेय इव्हेंटचा पीआरओ होतो. भारतातील नामांकीत छायाचित्रकारांचे काम याची देही याची डोळा बघितले आहे. तो अनुभव आणि माझ्या कॅमेऱ्याच्या बेसिक लेन्सच्या मर्यादेत राहून यथेच्छ फोटोग्राफी केली. या स्पर्धेच्या वेळी विविध कॅटॅगरीत अडीच हजारापर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली होती व नाशिकचे जवळ पास सर्व अनुभवी प्रेस फोटोग्राफर्स हजर होते.


बिग गन्स...शॉट गन
नाशिकमध्ये वेस्टर्न इंडिया स्पोर्टस्‌ असोसिएशनने आपल्या दशकपूर्ती वर्षारंभानिमीत्त नेव्हिगेशन कार रॅलीचे आयोजन केले होते. रॅली फक्त विसाच्या सदस्यांसाठीच होती, त्यामुळे जवळपास सर्वच स्पर्धक मातब्बर. "तुम्ही इतकी वर्षे विसा सोबत आहात, तर तुम्ही सुद्धा भाग घ्या', असे विसाचे अध्यक्ष अश्‍विन पंडित यांनी सांगितले. मला व दीपक ओढेकर यांना त्यामुळे संधी मिळाली. आम्ही दोघे सोडून, बाकी सर्वच मोटरस्पोर्टस्‌च्या खेळातील निष्णात. भलीमोठ्ठी प्रवेश फी आणि कोणताही पूर्वानूभव नाही, त्यामुळे स्पर्धेत नेव्हिगेटरची अवघड भूमीका पार पाडायची की नाही, या विषयी मनामध्ये साशंकता होती. ओढेकरांना कार्यबाहुल्यामुळे जमले नाही, मी सहभाग घेतला.
स्पर्धेचा एक नियम होता, ड्रायव्हर व नेव्हिगेटरच्या जोड्या या चिठ्ठी पद्धतीने ठरणार आणि रोड बुक स्पर्धा सुरू झाल्यानंतरच हातात मिळणार. आदल्या दिवशी ड्रायव्हर्स ब्रिफींगच्या वेळी अश्‍विन पंडितांनी कुशलतेने काही मुलभुत टिप्स दिल्या.

मातब्बर स्पर्धकांच्या उपस्थितीत शनिवारी विसाची "बिग गन्स कार रॅली' पार पडली. पहिल्यांदाच पोहण्याचा सराव करण्यासाठी पाण्यात उतरावे, तसा पहिल्या शंभर मीटर्सचा अनूभव होता. गाडीचे ओडोमीटर शुन्यावर सेट न करताच आम्ही स्टार्ट घेतला, इथेच पंडितांनी दिलेल्या मुलभूत सुचनांपैकी पहिल्या सुचनेकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतरचा प्रत्येक सेकंद माझ्याकरिता पाण्यात गटांगळ्याखाण्यासारखा होता. माझा ड्रायव्हर संजय खत्री हा निष्णात असल्याने अगदी बेफिकीर नसला तरी निश्‍चींत वाटत होता. प्रश्‍न होता, तो दोघांचे ट्युनिंग जमण्याचा. ते जेपर्यंत पहिली वेळनियंत्रक चौकी (टीसी पॉईंट) जवळ जवळ चुकली होती.

मी रस्त्याचे दिशादर्शन बिनचुक ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, तर पप्पु खत्री फक्त किलो मीटर्स मॅच होताहेत की नाही, यावर व पुढचे ट्युलीप जुळतेय की नाही यावर लक्ष ठेवत होता. वेळ आणि वेगाचे गणित करायला फुरसतच नव्हती. रस्ता चुकतोय असे लक्षात आल्यानंतर दोनदा मागे फिरून झिरो सेट केला, त्यात बहुमुल्य वेळ वाया गेला. पप्पु खत्री निश्‍चींत, पण गंभीर वाटत होता. नंतर मात्र आमचे टुनिंग छान जमु लागले.
दादासाहेब फाळके स्मारकापाशी स्पर्धेचा 81वा किलो मीटर पार केला तेव्हा आम्हाला कळून चुकले की, सगळे स्पर्धक बरोबर वेळेत दाखल झाले व दोन वगळता सगळ्यांनी सगळे टीसी, पीसी घेतले, त्यामुळे आपली स्पर्धा ही सहाव्या, सातव्या क्रमांकासाठी असेल.

संध्याकाळी साई-साया हॉटेलात बक्षिस वितरणासाठी हजेरी लावली. प्राथमिक निकाल बाहेर आला, त्यावेळी आम्ही चक्क चवथा क्रमांक पटकावला होता. पण अंतिम निकाल बाहेर आला आणि आश्‍चर्य घडले. आम्हाला चक्क तिसरा नंबर मिळाला होता. एअरटेल वन इंडिया रॅलीत पंचवीस लाखाच्या बक्षिसापर्यंत पोहाचेलेले अश्‍विन पंडित अनंत अडचणींना तोंड देत दुसऱ्या क्रमांकावर होते, तर गिरीश देवस्थळींच्या जोडीने जेतेपदाची बाजी मारली होती.
...अशा प्रकारे 2010ची सुरूवात धडाकेबाज झाली आहे. आणखी एक भव्य दिव्य, लाईफटाईम इव्हेंट थोडा पुढे ढकलला तो म्हणजे कोकण कडा रॅपलींग. अन्यथा माझ्यासाठी ऍडव्हेंचर स्पोर्टस्‌ फिल्डमध्ये हा ट्रिपल क्राऊन ठरला असता. अर्थात हा इव्हेंट होईल, तेव्हा मी त्यात सहभाग नक्की घेइन.

- प्रशांत परदेशी