पाच इंच रुंदी : तलम रेशमी कांती, desigh like the tigers eye
नाशिक, ता. 20 ः पावसाळ्याच्या मध्यकाळात पाऊस थोडा उघडला, की नानाविध प्रकारच्या कीटकांची सृष्टी अवतीर्ण होते. यातील काही कीटकांचे रूप-रंग विस्मयचकित करणारे असते. आता हेच बघा ना, पंचवटीतल्या अन्नपूर्णा कॉम्प्लेक्समध्ये आज एक महाकाय आकाराचे फुलपाखरू उडून आले होते. एक लहान मुलगी ते कागदी असावे या हिशेबाने उचलायला गेली तेव्हा ते उडाले. घाबरून तिने घरात हा प्रकार कथन केला तेव्हा आपल्या दारापाशी कमालीचा देखणा जीव आल्याची प्रचीती आली.
काही वर्षांपूर्वी नाशिकमधील पपाया नर्सरीजवळ हाताच्या मुठीपेक्षाही मोठ्या आकाराच्या गोगलगायी कुतूहलाचा विषय ठरल्या होत्या. पुढे जाऊन या गोगलगायींची अशी काही पैदास वाढली, की जिल्ह्यातील बागायती शेतीसाठी ते एक मोठे संकट ठरले. तेव्हा हाच देखणा जीव नकोसा झाला होता. पंचवटीत अन्नपूर्णा कॉम्प्लेक्समध्ये दृष्टीस पडलेले फुलपाखरूही अभ्यासाचा विषय ठरू शकते. सर्वच फुलपाखरू हे निष्पाप नसतात. काही फुलपाखरू झाडांच्या पानांवर, खोडावर किंवा फांद्यावर अंडकोष तयार करतात. त्यातील अळी पक्व झाली, की ती झाडांची पाने खाऊन फुलपाखरात तिचे रूपांतर होते. हे फुलपाखरूही चांगले पाच इंच रुंदीचे होते. त्या अर्थी त्याचे अंडकोषसुद्धा मोठे असणार व त्याची अळीसुद्धा पानांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडत असणार. त्यांची उत्पत्ती जर शेकडोंच्या संख्येने होणार असेल, तर मात्र ती जिल्ह्यातील शेतीच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरू शकते.
नाशिकमध्ये सध्या भेडसावणाऱ्या गोगलगायी या भूमीतल्या नाहीत. त्या प्रजातीला "जायंट आफ्रिकन लॅन्ड स्नेल' असे म्हणतात. आपल्याकडे क्वारेन्टाइन नियमाबद्दल कमालीची ढिलाई बाळगली जाते. न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे बूट औषधी पाण्याने धुऊन देतात. आपत्ती किंवा साथ ठरतील अशा जिवांना पायबंद घालण्यासाठी त्यामुळे पर्यटकांनी त्यांच्या देशातील रोगजंतू आपल्या देशात सोबत आणू नयेत, ही त्यामागची भावना! लाकूड, रोपे, फळे व भाज्यांच्या आयातीचे नियमही कडक आहेत. आपल्याकडे एरवी गोगलगायी किंवा फुलपाखरे महाकाय आकारातील सहसा आढळत नाहीत. एखाददुसरे चुकून आले आणि त्याच्या फौजाच्या फौजा तयार झाल्या तर? त्यामुळेच प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या फळ, भाज्या, रोपे आदींची काटेकोर तपासणी करण्याचे धोरण अवलंबायला हवे. त्यामुळे रोगमुक्त व उत्तम प्रतीचा माल येण्याची शाश्वती राहील.
No comments:
Post a Comment