Friday, August 6, 2010

अस्वस्थ ती!

अस्वस्थ करणारी अस्वस्थता
आज एक अतिशय सुंदर मुलगी आमच्या लहानग्या दुकानात आली होती. आमच्या छोट्याशा हस्तकला केंद्रावर काम करणाऱ्या दोघा मुलींशी तिची गेल्या वर्षभरापासून थोडी मैत्री जमली आहे. कालच सगळ्या जण विचारत होत्या की ती दिसत नाही हल्ली. नेमकी ती थोडं बोलायला आली आणि सगळ्यांनी तिला काल तिचीच आठवण काढल्याची कल्पना दिली. त्यावर तिचे उत्तर अस्वस्थ करणारे होते...
>
ती कोण आहे? तीचे नावा काय? कोणती जात, शिक्षण किती? असे प्रश्‍न त्या गोऱ्या पान तरूणीकडे बघितल्यावर सारखे मनात डोकवायचे...कारण ती आमच्या घरा समोरच्या कट पीसच्या दुकानात गेल्या दोन एक वर्षांपासून कामाला आहे. तिथे कपड्यांच्या घड्या घालणे...चहा-पाणी आणून देणे...झाडलोट करणे अशी कामे करताना ती दिसत असते...

मध्यमपेक्षा थोडी जास्त उंची...त्वचा उत्तम प्रकारे गोरी...ना हडकळी ना जाडी अशी मध्यम बांधणी...डोळे अतिशय बोलके...देवाने इतके सगळे देऊनही या मुलीचे नशिब तिला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे. हा प्रश्‍न शुक्रवारच्या दुपारी माझ्या डोक्‍यात पुन्हा डोकावला...आमची सौभाग्यवती तशी समजुतदार आहे...परंतू त्या तरूणी बद्दल चौकशी केलेली तिला आवडली असती की नाही...ठाऊक नाही...

माझ्या कडे हे नाही...माझ्या कडे ते नाही...चांगले घर असते तर...घरात गाडी असती तर...शिक्षणासाठी पैसा असता तर...घरच्यांनी एखाद्या चांगल्या कलेत पारंगत केले असते तर...चांगले सौदर्य मिळाले असते तर...चांगला आवाज...चांगली उंची...चांगले डोळे...चांगले केस...गोड गळा...भरदार आवाज...अशा एक ना अनेक गोष्टींची कामना करणारे लोक बरच भेटतात...या पैकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कामना या तरूणीच्या मनात सुद्धा नक्कीच असावी...कदाचीत गरिब कुटूंबातून आल्याने शिक्षण-संस्कार झाले नसतील...घरात पैशांची चणचण असेल...किंवा कमावणारे हात कमी व खाणारे तोंड अधिक असतील...काहीही असो...अशा मुलींचे नीट संगोपन झाले तर त्यांच्यातही एखादी "फुलराणी' तयार होऊ शकते...प्रश्‍न असा आहे...त्यांना कुठल्या शॉ'चा वरदहस्त लाभणार...आजकाल तर अशा तरूणींचे शोषण सहजगत्या होण्याचारखी स्थिती...त्यांच्यात उमेद जागवणे तर महत्वाचे...परंतू त्यांना सगळ्यात महत्वाचे म्हणजे जगायला शिकवायला हवे...सर्व काही असूनही जगता न येणाऱ्या गोष्टींची माहिती करून द्यायला हवी...माणसांची पारख करताना...चांगले व वाईट...दोघांना समान भावनेने बघता यायला हवे...शेवटी...येणाऱ्या काळात...चांगला किती चांगला...वाईट किती वाईट...हे स्पष्ट होईलच...परंतू...अशा तरूणींमध्ये नवी उमेद जागविताना त्यांना समोरच्या ओळखी...अनोळखी माणसांचा सामना कसा करावा...चांलताना...बोलताना सुरक्षित अंतर कसे ठेवावे...आपली कारकिर्द घडविताना- आपले लक्ष्य साध्य करण्याच्या वाटेत बाधा येऊ देऊ न देता आपल्या स्थितीत बदल कसा घडवावा...काय केले म्हणजे आपल्याला कमाईचे साधन मिळू शकेल...चांगली नोकरी...चांगल्या सेवा क्षेत्रात...उत्पादन...विपणन...अशा कुठल्याही क्षेत्रात ही तरूणी तयार होऊ शकते...यथावकाश तीला चांगला जोडीदार सुद्धा मिळू शकतो...कुटुंबाला देखिल ती सावरू शकते...मुळात तीने घाईगडबडीत चांगला जोड
ीदार शोधला आहे की वाईट हे कळायला मार्ग नाही...परंतू तिच्या बोलण्यातील दुख:च्या छटा या नक्कीच नाहीशा होऊ शकतात...प्रश्‍न आहे ती तीला फुलराणी बनविणारा शॉ सापडण्याचा...तिने सुद्धा नीट पारखून चांगला गुरू शोधावा...असा गुरू...जो तीला सातत्याने मार्गदर्शन करू शकेल...त्रयस्त भावनेतून तीच्या कारकिर्दीला आकार देऊ शकेल...
...बघु या काय देवाची मर्जी आहे ती...

No comments: