Monday, June 14, 2010

मुंगळे : त्यांना झाले तरी काय?

नाशिकशहरात भरवस्तीत, केटीएचएम महाविद्यालयालगत हाताच्या पंजाच्या आकाराचे दोन टॅरेन्ट्यूला (भलेमोठे कोळी) आढळले...आमच्या घरातही या उन्हाळ्यात एक वेगळी घटना घडत होती...रोज त्याकडे लक्ष जायचे, पण त्यातला वेगळेपणा लक्षात येत नव्हता...पण आता त्यातले गांभीर्य लक्षात यायला लागले आहे...उन्हाळयाच्या तोंडावर मुंग्यां अन्नाचे कण साठवून ठेवतात हे सर्वांना ठाऊक आहे...त्यामुळे मुंग्यांच्या रांगा तोंडात पदार्थ नेताना दिसल्या की ती पावसाळ्याची चाहुल ओळखावी...ग्रामीण भागात उन्हाळ्यात लग्न असलेल्या घरात बुंदी किंवा साखरेवर मोठ मोठे मुंगळे आढळतात...आपल्याकडे काळ्या मुंग्यांना धार्मिक दृष्ट्या शुभ मानले आहे...आमच्या पेठरस्त्यावरील घरात उन्हाळ्यात यंदा गॅलरीतुन किचनच्या दिशेने कुच करणाऱ्या मोठ मोठ्या मुंगळ्यांच्या रांगा दिसु लागल्या...निसर्गाचे चक्र म्हणून गार्गी व मैत्रेयी यांना या रांगा मुद्दाम दाखविल्या. त्यांचा अर्थात त्याबाबत फारसा इंटरेस्ट जागा झाला नाही...काही दिवसांनी हे मोठमोठे मुंगळे घरात सर्वत्र पसरू लागले...

त्यांना दिसते की नाही?
टॉयलेटमध्ये गेल्यानंतर ते पायावर चढायचे...त्यांच्या समोर एखादी वस्तु वाजविली तरी ते फारसे डिस्टर्ब होत नसे...मला वाटले ही त्यांची धीटाई आहे...पण नंतर असे वाटू लागले की त्यांना डोळे आहे की नाही...त्यांचे डोळे दिसत नव्हते...त्यांच्या समोर काही आपटले तरी त्यांना ते कळत नव्हते...टिचकी मारली की ते सैरभैर व्हायचे...मे महिन्यात घरात काही जणांना या मुंगळ्यांनी चावा घेतला...सौभाग्यवती म्हाल्या त्यांचा डंख जोरदार असतो...परंतू ते अंगाला चिकटले तरी समजायचे नाही...फक्त रक्ताचा थेंब आपल्या अंगातून यायचा...आई सतत म्हणायची मेडिकलमधुन या मुंगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही तरी औषध घेऊन ये...निसर्गाच्या साखळीतले महत्वाचे किटक म्हणून मी आईला नुसते हो म्हणायचो...प्रत्यक्षात औषध आणले नाही...

आईन्स्टाईन "आई'
आईने किचनमध्ये मुंगळ्यांचे छिद्र चक्क बेलाडोनच्या पट्टीने झाकून टाकले तेव्हा आईची कृती मला अल्बर्ट आईन्स्टाईन सारखी भासली. या छिद्य्रातून मुंगळे ये जा करत...परंतू त्यांचा वेग बराच मंद झाला होता...जुनच्या पहिल्या सप्ताहातली गोष्ट...आईने उरलेले औषध कोठे ठेऊ म्हणून विचारले...आख्खी गॅलरी मुंगळ्यांच्या भरून गेली होती...पाऊडर टाकल्याने बरेच मुंगळे मरून पडले होते...मी मनातून थोडा हळहळो...दोन दिवसांनी पुन्हा बरोच मुंगळे पावडरच्या प्रभावामुळे मरून पडले होते...तरीही रात्रीच्या वेळी काही अंगावर चढून यायचे...एखादा दुसरा चावा सुद्धा घ्यायचा...

त्यांचे सेन्सेशन हरवले आहे का?
आमच्या घराच्या आसपास थोडी झाडी आहे व मोकळी जागा आहे...परंतू आजवरक कधीही इतक्‍या मोठ्या प्रमाणात मुंगळे आले नव्हते...अजुनी ते ये-जा करतात...सर्वात म्हत्वाचे म्हणजे त्यांना सेन्सेशन आहे की नाही...दृष्टी आहे की नाही...या शंका मनात घर करून आहेत...हल्ली निसर्गातले असे बदल जागतिक तापमानवाढीशी जोडले जातात...हा सुद्धा तसाच काहीसा प्रकार तर नाही?

No comments: