Monday, April 12, 2010

हा रविवार चांगलाच लक्षात राहील...

गार्गी (दुसरी) मैत्रेयी (बालवाडी) यांच्या परिक्षा संपल्यानंतरचा पहिला रविवार बाहेर कुठेही फिरायला जाण्याचा प्लॅन नव्हता. म्हटलं घरातलीच राहिलेल्या कामांना माझी साप्ताहीक सुट्टी सत्कारणी लाऊ! पण कसले काय, मित्रवर्य कैलास(चंद्र) ठाकरेंचा फोन आला की देवळाली कॅम्पला थोडी खरेदी करूया आणि तिथल्या मंदिर परिसरात दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेऊया.
...हातातली कामे तशीच बाजुला ठेऊन आमच्या सौभाग्यवतिंनी छान पैकी इडली, डोसे बनवून घेतले. पंडित कॉलनीत श्री. ठाकरेंच्या घरी गेलो तर त्यांची कार सुरू होईना...दुपारचा बारा वाजलेले. मग त्यांनी सांगितले, देवळालीचं कॅन्सल करू, तुम्हीच जवळ पासचे ठिकाण सुचवा...माझ्या मनात पांडवलेण्यांच्या जवळीत नेहरू नक्षत्रवनाचा बेत होता, परंतू काही तरी वेगळा स्पॉट सुचवा अशी फर्माईश आली...मग मकालू हॉटेलच्या जवळ आमच्या दुचाक्‍यांमध्ये पेट्रोलची मात्रा घेतली आणि सोमेश्‍वरचा रस्ता धरला...वाटेत ठाकरे दांम्पत्याने ताजे पेरू घेतले...मग सामेश्‍वर सोडले आणि शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदिराचा रस्ता धरला, परंतू माझ्या डोक्‍यात ते ठिकाण नव्हतेच...मी वाय फोर्कवर गंगापूर गावात टर्न घेतला. जुन्या धाटणीचं ते लहानसं इतिहास प्रसिद्ध गाव...गावातील ऐतिहासिक सोनवणे वाड्या समोरून आम्ही गोदेच्या सांडव्यावर आलो...तेथे वाहणारे अथांग पाणी बघुन साऱ्यांची मने प्रसन्न झाली...कैलास, स्मिता व लहानगी यज्ञा या ठाकरे कुटुंबियांकरिता हा स्पॉट नवा होता...तिथून गाठले ते जलालपूर व गोदेच्या किनाऱ्यावर नितांत शांत व रमणीय ठिकाणी वसलेला गोविंद महाराजांचा आश्रम...आमच्या सौभाग्यवता नम्रताबाईंना हे ठिकाण ठाऊक असल्याने सर्वांना आडवाटेने पायी जायला सांगितले...वाटेत शेताच्या बांधाचे पाणी...अंब्याची झाडे बघुन मुली हरखुन गेल्या...आश्रमात पायावर पाणी घेतले आणि प्रथम गोविंद महाराजांचे दर्शन घेऊन थेट भोजनावर ताव मारला...गोदेच्या नितांत शांत, रमणीय प्रवाहाच्या साक्षीने तास दिडसात हा वजभोजाचा कार्यक्रम सुरू होता...उन्ह मी म्हणत असतानाही विविध पक्षांच्या खोड्या सूरू होत्या...भोजन आटोपल्यावर गार्गी, मैत्रेयी, यज्ञा यांना पाण्यात उतरवले...तीन वाजेच्या सुमारास परतीचा रस्ता धरला...म्हटलं संध्याकाळी काही तर व
ेगळा प्रोग्राम करू...उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता...तशाच अपूर्वाई हॉटेलच्या अलिकडे स्मिता ठाकरेंना अस्वस्थपणा जाणवू लागला...मी पुढे असल्याने कैलासने मला थांबण्याचा इशारा केला...माझ्या डोक्‍यात कल्पना होती ती आनंदवल्ली गावातल्या रस गुऱ्हाळात थांबून ताजा रस घेऊ म्हणजे थोडं बरं वाटेल...आम्ही गाड्यांना स्टार्ट दिला सुद्धा...पण स्मिता ठाकरेंना जास्तच त्रास जाणवत होता...पाहता पाहता त्यांनी डोळे पांढरे केले व त्यांची शुद्ध हरपली...सौभाग्यवती नम्रतांनी तातडीने त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला...लहानगी यज्ञा आईची अवस्था बघुन रडू लागली...तर माझ्या मुली विस्मयचकित होऊन सारे पहात होत्या...मी रस्त्यावर धावलो...पण एकही रिक्षा किंवा वाहन दिसत नव्हते...एक रिक्षा समोरून आली...पण त्यात एक महिला होती व त्यांनी रेल्वे पकडण्यासाठी स्पेशल रिक्षा केली होती...माझी आर्जव बघुन रिक्षा पूढे जाऊन थांबली...त्यांना झाला प्रकार कथन केला व त्यांनी तातडीने पेशंटला नेण्याची तयारी दर्शविली...आनंदवल्ली येथे डॉ. राहूल भोसले दवाखान्यात नव्हते...तेव्हा केटीएचएम महाविद्यालया समोर देवगारकर इस्पितळ गाठले...तो पर्यंत स्मिता ठाकरे पुन्हा शुद्धीवर आल्या होत्या...पण अंगात प्रचंड अशक्तपणा त्यांना जाणवत होता...डॉक्‍टरांनी उन लागल्याचे प्राथमिक निदान करून उपचार सुरू केले...मी कैलास ठाकरेंच्या घरात सगळ्या मुलींनी सांभाळत बसलो...तर नम्रताबाई दवाखान्यात स्मितांबाईंच्या जवळ थांबल्या...एक सलाईन संपल्यावर नम्रताबाईंना घेऊन कैलासराव त्यांच्या घरी आले...आमच्या सौभाग्यवतिंनी त्यांचे किचेन आवरून दिले व घर स्वच्छ केले...आता स्मिताबाई दोन तिन दिवस काम करू शकणार नाही हे स्पष्टच होते...रात्री ठाकरेंसाठी मग दाळ-वाटीचा मेन्यू तयार केला...रात्रीच स्मिताबाईंना डिस्चार्ज मिळाला...ऊन लागणे काय असते हे
नुसते ऐकुन होतो...प्रत्यक्ष त्याची अनूभूती आम्ही प्रथमच घेतली...तातडीने हालचाल केल्याने रूग्णाला फारसा त्रास झाला नाही...फक्त इतकेच समजले की त्यांना यापूर्वी सुद्धा असा त्रास झाला आहे...आहार व व्यायामाच्या बाबतीत निष्काळजीपणा...हल्लीच्या वर्कहोलिक कल्चरमधली ही आणखी एक वर्कहोलिक (शब्द अल्कोहोलिकवरून, म्हणजे आपल्या क्षेत्रात देहभान विसरून वेड्यागत काम करणारी मंडळी) केस असल्याचे समजले...आमच्या सौभाग्यवती सुद्धा एखाद्या कामाचा असाच जिवतोड पाठपूरावा करतात...परंतू आपले शरीर हे आरामासाठी किंवा बसल्या जागी काम करण्यासाठी बनलेले नाही...त्यांची सातत्याने हालचाल गरजेची आहे...चांगला आहार घ्यावा व कोणत्या गोष्टी परिक्षाम करतात व दुष्परिणाम करतात यांची गृहिणींनी माहिती घ्यावी....त्या दृष्टीने माझ्या सौ व मुलींकरिता सुद्धा आजचा रविवार ( 11 एप्रिल, 2010) लक्षात राहणारा ठरला...

No comments: