
"स्टार माझा'च्या चमुवर झालेल्या हल्ल्याचा तिव्रपणे निषेध करण्यापूर्वी काही प्रश्न माझ्या मनात सारखा घोळत आहे:
1. पत्रकारीता या पेशाला समाजात मान-सन्मान आहे, तसा त्यांचा वचकही आहे.
जबाबदार व्यक्ती( अधिकारी, नेते, उद्योजक, कलावंत) तर मिडीयाचा सन्मान करायला चुकत नाहीत; व्यक्तीश: ते कितीही चुकत असले तरीही!
मोठ्या ब्रॅन्डचा मिडीया असेल तर काही त्रासच नाही, सर्व काही आलबेल.
अगदी व्हीआयपी ट्रिटमेंट.
लाल पायघड्या पांघरून स्वागतच!
- हा समज नाशिकमध्ये सचिन अहिरराव व आता नितीन भालेराव यांच्यावरील हल्ल्याने खोटा ठरवला आहे.
- माझ्या मते हा समज खोटा होताच, परंतू अनेकांच्या मनात पत्रकारितेचे जे चित्र उभे आहे, ती धारणा फसवी असल्याची ही दोन ठळक उदाहरणे.
2. पत्रकारांवर किंवा पत्रकारीतेवर हल्ला होण्याची काय ही पहिलीच वेळ आहे?
- नाही! तळमळीने ही सेवा करणाऱ्यांवर यापूर्वीही हल्ले झाले आहेत. भविष्यातही होत राहणार! यात शंका नाही?
स्तुती केलेले, कौतुक केलेले कुणाला आवडणार नाही? एखादा शब्द विरोधात गेला तर मात्र "मिडीया खराब'"अमुक प्रतिनिधी' पैसेखाऊ! असे सर्रास आरोप होतात.
3. बजाज फायनान्स प्रकरणात मिडीयाने फक्त घटनेची दखल घेतली होती. त्या घटनेचे वृत्त येण्याच्या आतच असा तुफान हल्ला झाला.
- यावरून एक गोष्टी स्पष्ट होते, ती म्हणजे वसुली करणाऱ्या कंपनीला आपण केलेल्या किंवा आपल्या हातुन घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य कळून चुकले होते. त्यात व्यवसायत: दांडगटपणा, त्यामुळे मिडीयाकडून वस्तुनिष्ठ वृत्त येणार, विरोधातली बातमी येणार, की दोन्ही बाजुंना आपले म्हणणे मांडण्याची संधी देणार, याची वाट पाहण्याच्या आगोदरच मिडीयावर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाला.
4. पोलिसांना क्रॉस कम्पलेनमध्ये किती इंटरेस्ट असतो, हे सर्वश्रृत आहे, परंतू बजाज फायनान्स कर्मचाऱ्यांची आगळीक ढळढळीतपणे स्पष्ट दिसत असतानाही, त्यांनी पत्रकारावर दंगलीचा गुन्हा दाखल करावा?
- व्यक्तीश: मला यात आश्चर्य वाटले नाही. या सारखे पोलिसांचे व गुंडाचे प्रताप मी व्यक्तीश: बघितले आहेत, आणि अनुभवले सुद्धा आहेत.
5. भालेरावांनी "इन्सिपिरेशन'चा जो मुद्दा उपस्थित केला, त्याने सर्वांनाच विचारात टाकायला हवे.
- पत्रकारांच्या रूपातील द्वारपालाचे मनोधैर्य असल्या गुंडगिरीने खचणार नाही, हे नक्की, पण मेनस्ट्रिमच्या बाहेरही मोठा मिडीया आहे. त्यांची "हाईरारकी', त्यांचे नियम, घटनांचे व आपल्या सहकाऱ्यांचे आकलन ते कोणत्या पद्धतीने करतात? याचा कोणताही ठावठिकाणा नसतो, अशी पत्रकारीतेतील, तिकेच महत्वाचे कार्य बजावणारी सेकंड, थर्ड, फोर्थ बॅच मेनस्ट्रिम मिडीयाच्या प्रतिनिधींवरील हल्ल्यामुळे व त्यांच्यावरील गुन्ह्यांमुळे बैचेन झाली नाही तरच नवल.
6. हे कायद्याचे, न्यायाचे राज्य आहे, असे सारेच म्हणतात.
- परंतू न्याय मिळत नसेल तर तो मिळवावा लागतो. पत्रकारांची छोटीशी दुनिया मुळातच प्रचंड विखुरलेली. मने सहजासहजी जवळ येत नाहीत. रकाने खरडताना, सण-वार, मित्र-परिवार, घर-दार सगळ्यांवर अन्याय होतो, आणि स्वत:वर बितली तर मग विचारूच नका.
त्यामुळेच "मिडीया ऑफ नासिक युनाईट' ही हाक द्यावीशी वाटते.
- फक्त नाशिकच का? तर आपले प्रश्न आपण घेऊन पुढे जाऊ शकतो. समाजाचे प्रश्न तर आपण मांडत असतोच. त्यातही प्रामाणिकपणे, तळमळीने काम करणारे स्वत:वर अन्याय झाला, तरी क्षमाशील मनाने थोड्याच कालावधीत झाले, गेले विसरायला लागतात... आणि मधुनच एखादी सचिन अहिरराव, नितीन भालेराव, अरूण दीक्षित घटना घडते.
-त्याकरिता नाशिकच्या मिडीयाने सोशल, सेल्फ इश्युज घेऊन महिन्यातून किमान एकदा एकत्र यायला काय हरकत आहे.
- प्रशांत परदेशी, नाशिक.
No comments:
Post a Comment