Thursday, February 10, 2011

व्हॉली क्रॉसिंग...

आसू...आणि हासू...



A participant enjoys the Talwade
valley of mount Anjaneri...


कधी मित्रांसोबत, कधी परिवारासोबत, तर कधी विविध संस्थेच्या गटांसोबत सह्याद्रीतल्या डोंगरकपारी भटकण्याचा माझा छंद गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून अव्ह्यातपणे सुरू आहे. या चंदेरी कालखंडात निसर्गाची नानाविविध रूपे अनूभवायास मिळाली; त्यातलाच एक भन्नाट अनूभव रविवारी (ता. 3 फेब्रुवारी 2011) लाभला...पण हाय रे दुर्दैव...हा आनंद तरी किती क्षणभंगूर ठरला....त्याच या कटू-गोड आठवणी...(ब्लॉगवर सविस्तरवाचा)



"वैनतेय' संस्थेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे...त्यानिमीत्ताने अनेक चांगल्या मोहिमा आखण्यात आल्या आहेत. शनिवारी व रविवारी अंजनेरी पर्वतावरच्या तळवाडे खिंडीत व्हॉली क्रॉसिंगचे आयोजन करण्यात आले होते...सह्याद्रीतली सर्वात उत्तूंग पर्वतश्रृंखला नाशिककरांच्या वाट्याला आली आहे...त्यातील त्र्यंबकची डोंगररांग देखिल चार ते पावणे पाच हजार फुटा उंचीत मोडणारी...अंजनेरीच्या तळवाडे खिंडीतील दोन डोंगरकड्यांना साडे तीनशे फुटांचा आडवा दोर बांधण्यात आला होता. कमरेला हार्नेस बांधून व पायाला लेगलूप लाऊन ही उभी-उंच दरी पार कराण्याचा भन्नाट अभुनव मिळाला...सर्वासाठीच हा उपक्रम खुला होता...त्यामानेने इतक्‍या उंचीवर लटकण्याची अपूर्व संधी सर्वांना होती...

 शनिवार व रविवारी असे दोन्ही दिवस मला दरीच्या मधोमध लटकून माझ्या हौशीछायाचित्रण छंदाची हौस भागवायला मिळाली. मोठमोठ्या आकाराच्या कैक शिळा पडलेली तळवाड्याची घळ पार करून जाण्याचा आनंद आयुष्यभर लूटला आहे...या घळीच्या मधोमध लटकुन दोन्ही दिवस भरपूर छायाचित्रे घेतली. रविवारी तर चार जणांचा एक गट यातून उतरत होता...त्यामुळे किमान दोन विहंगम छायाचित्रे उत्तम उतरली आहेत...


Event leaders Samiran and Pratik
Discuss about the future
of this sport during abreak time...

शनिवारी समीरण कोल्हे, सोमदत्त म्हस्कर, प्रतिक रनाळकर या मोहिमेच्या नेत्यांनी खुप मजा केली...मागच्या मोहिमेपेक्षा यंदा सहभागींचा प्रतिसाद निम्माच लाभला...प्रसिद्धी थोडी कमी पडली असावी...परंतू यंदाचे अंतर मागच्या वेळेपेक्षा जास्त होते...विशेष म्हणजे दरीच्या मधोमध आल्यानंतर उर्वरीत दोर दोन्ही हातांनी पूर्णजोर लाऊन पार करावा लागायचा...नवोदितांना त्यामुळे बरीच दमछाक झाली होती...यंदा नव्या दोराचा उतार व टेन्शन अतिशय योग्य राखल्याने सहभागींना खऱ्या अर्थाने दरीच्या विहंगम दृष्ट्याचा आनंद लुटता आला...मागच्या वेळच्या तुलनेत यंदा महिलांचा सहभाग बराच कमी होता...त्र्यंबकेश्‍वरच्या मंडळींनी नेहमी प्रमाणे उत्तम प्रतिसाद दिला...आणखी दोन एक वर्षात इथल्या मंडळींना पर्वतारोहणातील धाडसी खेळाचे वेड लागलेले दिसु लागेल...त्याकामी राजेश दीक्षित, सचिन पाचोरकर, गिरीष जोशी, कैलास घुले, बापू शुक्‍ल, सत्यप्रिय शुक्‍ल, किरण अडसरे वगैरे मंडळी नव्या पिढीस प्रोत्साहीत करण्याकामी पुढाकार घ्यावा...

Chikki's remarkable leap, with
the Navra pinnacle of
Anjaneri in the background;
incidently a flock of valtures was
hovering around...
शनिवारी जतिंदर जेट्टी उर्फ चिक्की हा देखिल सोबत होता...त्याने डान्स स्टेपमधल्या काही नेत्रदिपक जम्स मारून दाखविल्या...त्या कॅमेऱ्यात टिपताना माझीही कसोटी लागली होती...विशेष म्हणजे नवरा सुळक्‍याच्या पार्श्‍वभूमीवर त्याच्या एका उडीत दोन गिधाडे मागे उडताना आली आहेत...आहे की नाही आश्‍चर्य..."निसर्गाचा स्वच्छक' अशी ओळख असलेल्या गिधाडाना उडताना बघण्याची इच्छा प्रथमच पूर्ण झाली...पण हे आश्‍चर्य इथेच संपत नाही...

परतताना आकाश निळेशार दिसत होते...सोनेरी कड्यांवर गायीचे कळप चरताहेत...त्याच्या भोवताली बगळ्यांचे कळप बागडताहेत...हे दृष्य बघुन चिक्की हरखून गेला...देशभरात कोरीयोग्राफीमुळे कामाचा व्याप अतिशय व्यस्त असतो...अशात व्हॉली क्रॉसिंगची मजा आणि निसर्गातला हा नजरा अनुभवायला मिळाल्याबद्दल तो सारखे धन्यवाद देत होता...


आसू...आणि हासू...

रविवारी नाशिकच्या छायाचित्रकारांनी काढलेल्या कार रॅलीच्या छायाचित्रांचे "द रेस' प्रदर्शन राजा पाटेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्याविकास सर्कल जवळील आर्ट गॅलरीत भरविले...त्यात माझी काही छायाचित्रे आहेत...हॉलीवूटपटात ज्युलिया रॉबर्टस्‌ सोबत छोटासा रोल करणारे नाशिकचे आनंद बापट, वेस्टर्न इंडिया स्पोर्टस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष श्रेयस यंदे, राष्ट्रीय स्तरावरचे रायडर शमिम खान, कौस्तुभ मच्छे, नितीन भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत...टाईम्सच्या नाशिक आवृत्तीत सद्या लिखाण करणारे ज्येष्ठ क्रीडा समिक्षक दीपक ओढेकर यांच्या हस्ते करण्यात आले...त्यामुळे रविवारी व्हॅली क्रॉसिंगला जाण्यास अमळ उशिर झाला...

Maitrayee, std 1st never felt the
burden of the height of Anjaneri
or the blazing heat of the Sun
either...from start to finish
this smile was there...
आज माझी 6 वर्षांची कन्या मैत्रेयी व नऊ वर्षांची गार्गी यांना सोबत घेतले होते...मैत्रेयीची या बाजूने ही दुसरी अंजनेरी भेट, तर गार्गी दोन्ही बाजुंनी मिळून पाचव्यांदा अंजनेरीवर सोबत होती...दुपारची उन्हे मी म्हणत होती...सर्वत्र वाळलेल्या सोनेरी-पिवळ्या गवताची नक्षी काय वर्णावी...उन्हाळ्यातील ट्रेकची ही खास मजा असते...

तळवाडे घळीत कोसळलेल्या मोठमोठ्या शिळा गार्गी-मैत्रेयीने कुणाचीही मदत न घेता पार केल्या...टाईम्स ऑफ इंडिया, नाशिकच्या संपादकीयं प्रमुख सुमिता सरकार, सर्वांचा लाडका कॅमेरामन ज्ञानेश्‍वर सोबत होते...आमच्या दुचाकी आम्ही करवंदाच्या जाळीत पार्क केल्या होत्या...

Gargi's this was fifth visit to Anjaneri,
though she and Maitrayee enjoy
being their, they vere scared to
do the Valley crossing...
मैत्रेयी बरीच लहान असल्याने व स्वत: मोठमोठ्या शिळांवर ग्रीप घेऊन चढत असल्याने आम्ही बरेच मागे राहिलो...तिला सारखी तहान लागत होती...तेव्हा एका कपारीतले थंडगार पाणी तिला वस्त्रगाळ करून प्यायला दिले...त्यापाण्याचा गारवा...त्याची मजा स्वत: अनुभव घेतल्याशिवाय समजू शकणार नाही...

वर पोहोचल्यावर सुमिता, ज्ञानेश्‍वर, प्रतिक, सोमदत्त यांनी दगडाच्या धारेतील थंड गार पाण्याचा आस्वाद घेतला...सुमिता गार्गी-मैत्रेयीला घेऊन तळावरचे अंजने मातेच्या मंदिरात गेली...तोवर मी पुन्हा दरीत लटकून काही छायाचित्रे घेतली...पलीकडे उतरलो तेव्हा आजवर कधीही अनुभवले नव्हते...ते आश्‍चर्य बघाला मिळाले...सोमदत्तने हवेत उंचच उंच झेपावलेल्या गिधाडांची गणती केली तेव्हा पंचवीस गिधाडे भरली...सुरूवातीला मला ते करूड वाटले परंतू सोमदत्तने पंख आठ फुट पसरल्याचा अंदाज व्यक्त केला...पतिकने पक्षांच्या माना लांबलचक असल्याचा अनुभव सांगितला...

आजही सहभागींची संख्या बरीच कमी होती...त्यामुळे सव्वाचारच्या सुमाराला दोर सोडण्यात आला...मुलींना सोबत घेऊन सुमिता, ज्ञानेश्‍वरसह आम्ही परतीच्या वाटेला लागलो...गार्गी व मैत्रेयी यांना निसरड्या उतारवरून खाली येताना बरीच काळजी घ्यावी लागत होती...मैत्रेयीला तर पायांची ग्रीप घेणे जमत नव्हते...त्यामुळे ती सारखी घसरत होती...परंतू पडली नाही...

Dayaneshwar alias Maulie,
the dare devil cameraman
extinguishes the bushfire
with a leafy branch of
 Karvand shrub.


तळवाडे घटीचा मुख्य कडा उतरून पहिले पठार पार करताना खालून मोठ्या प्रमाणावर धुर येताना दिसत होता...वर अंजनेरीच्या मुख्य माथ्यावर वणवा भडकला होता...शहरातून आलेल्या चार जणांच्या टोळक्‍याचेच हे कृत्या असावे...गांवकरी आपल्याच गवताचे साठे असा पेटवणार नाहीत...आणि दुसरं कोणी त्याठिकाणी नव्हता...उतरताना हे टोळकं आमच्या पुढे दिड तास अगोदर उतरलं...त्यांचेच हे काळे कृत्य असण्याची दाट शक्‍यता आहे...खाली ज्ञानेश्‍वर व सुमिता करवंदाच्या फांद्यांचे झुपके करून आग विझविण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते...जोरदार वाऱ्याबरोबर आग झपाट्याने पसरत होती...मला तर आग विझण्याची लक्षणे दिसत नव्हती...तेव्हा निसर्गातल हानीची काही छायाचित्रे मी पटापट टिपून घेतली...पेगलवाडीची एक महिला हातात झाडांचा झुपका घेऊन आग विझवत झपाट्याने वर येत होती...मी त्यांना विचारले...आग कोणी लावली असावी...त्यांनी माझ्या प्रश्‍नाकडे सरळ दुर्लक्ष केले व भराभर सपकारे मारून पसरणारी आग विझविण्याची कसरत सुरू केली...ज्ञानेश्‍वर, सुमीता व मी असे चौघे जण आता विझविण्याच्या कामाला लागलो होतो...दाट गवत पेटून गेल्यानंतर दगडांवरचे खुरटे गवत आम्ही वेळीच विझवू शकलो...त्यामहिलेची मात्र कमाल...अनवाणी निसरडे डोंगरकडे ती ज्यापद्धतीने धावत जाऊन झपाटल्यागत आगविझवत होती...ते बघुन वाटले शहरी मानसिकता किती वाईट...काडी टाकून निघून गेले...परंतू गोरगरिबांच्या जनावरांचा चारा व लाकूडफाट्याच्या दोन गंजी डोळ्यांच्या देखत राख झाल्या...त्या महिलेच्या जिद्द व शारीरिक क्षमतेच्या जवळपाससुद्धा शहरी माणूस पोहचू शकणार नाही...आग विझविल्यावर थोडा दम घेऊन ती महिला इतकेच म्हणाली...आग कोणी लावली माहित नाही...आणि आपल्या गावाच्या दिशेने निघुन गेली...



With the strong breeze blowing
eastwards; their was a great
danger of whole grass and trees on
the mountain of Anjaneri getting
burnt..
तुपादेवी शिवारातून तीन युवक जेवण सोडून धावत येताना दिसले...आग आटोक्‍यात आल्याचे आम्ही त्यांना सांगितले...तेव्हा त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून गिर्यारोहण मोहिमेवर असलेल्या युवकांवरच संशय घेतला...आम्हीच तात्काळ खुलासा केला की आम्ही सुद्धा त्या युवकांसोबतच आहोत...आम्हाला त्यांनी आग विझविताना बघितले होते...तेव्हा ते म्हणाले बरे झाले तुम्ही सांगितले...नाही तर आम्ही त्यांना बघुन घेणार होतो...इथले गवत, झाडे झुडपे, पक्षांची घरटी - केवढे नुकसान झाले असेल...शहरी माणसेच वृक्ष व पर्यावरणाबद्दल बोलतात आणि अशी राक्षसी वागतात...यापुढे शहरातून येणाऱ्या माणसांना आम्ही या परिसरात बंदी घालू...तीन वर्षांपुर्वी समोरचा डोंगर असाच पेटविल्याचे त्यांनी सांगितले...

एकीकडे व्हॅली क्रॉसिंगची मजा, गार्गी-मैत्रेयीची निसर्ग सफर, गिधाडांच्या कळपाचे अभूतपूर्व दर्शन अशा आनंदाचा शेवट वणव्याने व्हालाच हवा होता का....?