फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेचे सूप वाजले...तरी त्याचं कवित्व अजून सुरू आहे. महाराष्ट्रातील एका गर्भश्रीमंत व्यापारी व राजकीय पुढाऱ्याचा वर्तमानपत्राच्या संचालक मंडळावर असलेला मुलगा आपल्या लहानग्या मुलासह "जो-बर्गला अंतिम सामना बघण्यासाठी गेला होता...आपल्या मालकीच्या दैनिकात पहिल्या पानावर त्याने स्पर्धेबद्दल त्याचे अनुभव कथन केले आहेत...त्याच्या या बातमीतील वृत्तमूल्ये...तिची शैलीहा चर्चेचा विषय नाही...माझी चिंता वेगळीच आहे...
...पैसा...पैसा...पैसा
"खिशात आणि खात्यात' पैसा असला की माणसाचा आत्मविश्वास सातव्या आकाशावर चढल्याचे मी जवळून अनूभवले आहे...हाच आत्मविश्वास लक्ष्मीपूत्रांना सर्वसामान्यांपासून मात्र दूर नेत असतो...त्यामुळे आपले काय बिघडणार? ही मनोवृत्ती वाढीस लागल्याची उदाहरणे अनूभवण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही...एखादा बड्या कुटुंबातला मुलगा वाहतुक पोलिस, रखवालदार, लिफ्टमन, कारकुन या वर्गास धारेवर धरताना बऱ्याचदा दृष्टीस पडतात.
मुंबापूरीत 26 जुलै 2005ला झालेल्या अतिवृष्टीने पैशांचा कैफ किती अनाठायी ठरू शकतो हे जगाला दाखवून दिले आहे. असे अनेक व्यावसाय मुंबईत आहे जिथे दिवसाची कमाई वीस, पंचवीस लाखाच्या घरात जाईल. पण 26 जुलैच्या पावसाने साऱ्यांना समान पातळीवर आणले. वीज नाही, रस्ते कोंडवडलेले...रस्त्याच्या कडेला कारमध्ये अक्षरश: जखडून अनेकजण त्यावेळी मृत्यूमुखी पडले...तर काही जण इस्पितळात भरती झाले...अनेकांवर मानसिक परिणाम झाले...कमोड शिवाय बात नसणाऱ्यांना रस्त्याच्या किनाऱ्यावर "कार्यक्रम' उरकण्याची वेळ आली...अनेकांनी गरिब वस्तीतले पाणी पिले...पैशामुळे तुमचा आत्मविश्वास कितीही मोठा असला तरी जगात सर्वत्र सहजतेने वावरण्याचा तो (पैसा) परवाना नाही! हे तेव्हा स्पष्ट झाले होते...दक्षिण आफ्रिकेतल्या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यावर शिक्का मारला गेला...
Horrific experince of Jo'burg
"आमच्याकडे भरपूर पैसा आहे...कुणाच्या हात-पाया पडण्याची आवश्यकता नाही...अशी धारणा बनलेल्या श्रीमंतांच्या (कथित) पिढीसाठी या लक्ष्मीपुत्राचा अनुभव पुरेसा नेत्र उघडणारा आहे...म्हणजे त्याने लिहिलेल्या बातमीवरून नाही...तर त्याच्या अनुभवावरून...
महाशय म्हणतात, की दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेचे अभूतपूर्व आयोजन केले...समारोप सोहळ्याची रंगत डोळ्याचे पारणे फेडणारी होती...परंतु, मैदानात अनेक गोष्टींचा अभाव होता...अशा समारंभात कोणत्या गोष्टी असू नयेत याचा परिपाठ मिळाल्याचे ते म्हणतात...झाले असे की मैदानात समारोपाचा कार्यक्रम सुरू असताना थंडी वाढली...त्यांच्या लहानग्या मुलास ती असह्य झाल्याने त्यांनी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला...मैदानाबाहेर पडल्यानंतर त्यांची कार तीन किलोमीटरवर पार्क केली होती...सर्वच गाड्या लांबवर पार्क होत्या...कुणीही त्यांच्याकरिता गाडी आणेना...त्यांनी सोबत काही बॅंगा आणल्या होत्या...त्या घेऊन ते मुलाला उचलून तीन किलोमीटर चालू शकणार नव्हते...त्यांनी वाट्टेल तेवढा पैसा फेकण्याची तयारी दर्शविली...भेटेल त्याला आर्जव करीत होते...सुरक्षारक्षक...पोलिस...अटेन्डन्ट...पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष्य दिले नाही...सर्वांना अंतिम सामन्याकरिता सोपविलेली कामगिरी पार पाडायची होती...कोणीही आपली जागा सोडून जायाला तयार नव्हते...कमालीचे मेटाकुटीला आल्यानंतर मैदानात आलेली एक ऍम्ब्युलन्स त्यांना देण्यात आली व त्यांची नय्या पार झाली...म्हणजे त्यांना तीन किलोमीटरवरील त्यांच्या कारपर्यंत सोडण्यात आले...
तुमच्या पायांना काय झाले आहे...
श्रीमंत माणसाकडे पैसा जास्त असतो व वेळ कमी असतो. पैसा इतका की ते जग विकत घेऊ शकतात (असे त्यांना वाटते). वेळ इतका कमी असतो की ते भेटायला येणाऱ्यांशी मोजकेच बोलतात (म्हणजे फायदा असेल तरच), मित्र-परिवारातील कोणी आले तर एकतर कामाच्या तणावातून रिलीफ म्हणून किंवा थोडा ब्रेक म्हणूनही काही वेळा ही मंडळी प्रेमभावाने बोलण्याचा अविर्भाव आणतात...पण पैशाचा कैफ त्यांच्या बोलण्यातून नसला तरी कृतीतून सतत डोकावत असतो...या कथित संचालक पुत्राने पहिल्या पानावर व नंतर आतल्या पानात रकाने भरले तेव्हा त्याचे बुमरॅंग उलटू शकते याची कोणीत त्याला कल्पना दिली नाही...सुमार दर्जाची माणसे गोळा केल्यावर बातमीत काय आणि कसे सादर करायचे हे त्यांना फुकटचे कोण सांगणार...ही ठसठशीत बातमी शेवटी या तरूण संचालकावर उलटणार हे बुद्धिवादी वर्गाला समजण्याइतकी सरळसोट असती तरी एक वेळ चालले असते...परंतू त्यातली मेख ही तळागाळातल्या माणसालाही सहज समजेल याचा विचार सुद्धा केले गेला नाही...अहो हातातल्या बॅगा फेकुन का नाही दिल्या...जाताना तिथल्या हवामानाचा अंदाज का नाही घेतला...त्यानुसार गरम कपडे सोबत घ्यायला काय झाले होते...असे बेसिक प्रश्न सर्वसामान्य वाचकाच्याही सहज डोक्यात येतील...सल्लागारांच्या किंवा त्यांच्या हाताखालील संपादक वगैरेंच्या हे डोक्यात कसे आले नाही...या बातमीचा वार आपल्यावरच अधिक उलटू शकतो या बद्दल कोणी त्यांना अलर्ट कसे केले नाही...